अमरावती जिल्ह्यातील एक नावाजलेली साहित्य प्रकाशन संस्था म्हणजे गौरव प्रकाशन. साहित्यिकांच्या साहित्याला आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्धि देवून साहित्यिकांना सन्मानीत करीत असते या प्रकाशन संस्थेने आजपावेतो अनेक साहित्याकांच्या साहित्याला समाजासमोर आणले आहे या संस्थेचे संपादक मा. बंडूकुमार धवणे यांनी साहित्य चळवळ अखंडितपणे सुरु ठेवली आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथ भांडारात एकूण ५९ साहित्य कलाकृती विराजमान झालेल्या आहेत. एकेक दुवा निखळताना, मी महासत्तेच्या दाराशी कटोरा घेऊन उभा राहणार नाही, ब्रावो ! फॉक्स माइंड्स ऑफ कॅपिटॅलिस्ट, कृतिसंशोधन आराखडा, भाग्योदय, निलगंध, पारधी समाज बदल व समस्या, तीळ तीळ तुटताना, मानवी हक्क आणि प्रसार माध्यमे, एक होती परी, Multidisciplinary Research Valume – I & II, अन्नपूर्णा, वैश्विकरण मे न्याय का संवैधानिक मुल्यांकन, विदर्भात माझ्या, बंजारा हस्तकलेची शोकांतिका, घर कोसळताना, देवधर्म आणि माणूस, प्रतिभा आणि प्रतिमा, बौद्ध पुजा पाठ व संस्कार, तथागत, मी हे करू शकतो, आंबेडकरी चळवळतील एक संघर्ष पर्व अशा विविध विषयावरील दर्जेदार ग्रंथसंपदा गौरव प्रकाशनच्या नावावर आहे.
गौरव प्रकाशन प्रकाशित करीत असलेली एक साहित्य कलाकृती साधारणत: जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाचकांच्या भेटीला येत आहे. या साहित्य कलाकृतीची उत्सुकता सर्व अमरावतीवासीयांना लागली आहे. एका कर्तुत्ववान, जिगरबाज, उतुंग ध्येय गाठणा-या व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ही साहित्य कलाकृती निश्चितच अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिकांना दिशादर्शक ठरणारी आहे. या साहित्य कलाकृतीकड़े केवळ व्यक्ति विशेष म्हणून न पाहता त्या व्यक्तीच्या कार्याचा आपल्याला काही उपयोग होईल का? त्या व्यक्तीची कार्यपद्धती आपल्याला अवगत करता येइल का या अंगाने या कलाकृतीकडे बघावे लागणार आहे.
गौरव प्रकाशन ही संस्था प्रकाशन करीत असलेली कलाकृती जगावे एक पाऊलपुढे…. ही एका उतुंग व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या प्रती असलेल्या प्रेमाच्या, त्यांनी केलेल्या नि:स्पृह कार्याच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न केला आहे. म्हणून गौरव प्रकाशनच्या या साहित्य कलाकृतीच्या मुखपृष्ठावर अमरावतीचे भूषण डॉ. कमल मारोतीराव राउत यांचे चित्र घेतले असून या कलाकृतीला जगावे एक पाऊल पुढे…. असे शीर्षक दिले आहे. वरवर पाहता या मुखपृष्ठावर डॉ. कमल मारोतीराव राउत साहेबांचे चित्र, डांबरी रस्ता, कडेने झाडे, उगवतीचा सूर्य, त्यावर पाखरांची गर्दी, पाठीमागे धूसर होत गेलेला रस्ता, शीर्षक दोन रंगात वर अर्धा हिरवा आणि खाली अर्धा पांढरा असे दिसते तर रस्त्याच्या बाजूने थोड़ीफार हिरवळ वर मोकळे आकाश असे आपणास प्रथमदर्शनी दिसून येते. यातून का्य अर्थ बोध घ्यायचा हे समजुन घ्यायला हवे. वरवर दिसणारे साधे चित्र खुप काही अर्थबोध करीत असतात. मुखपृष्ठकाराने डॉ राउत साहेबांच्या जीवनशैलीवर एक प्रकारे प्रकाश टाकला आहे. त्यांच्या समृद्ध होत गेलेल्या जीवनातील बदलांचे यथार्थ वर्णन यातून प्रकट केले असावे असे मला वाटते. आपण या मुखपृष्ठावरील काही संदर्भांचा आणि डॉ साहेबांच्या व्यक्तिगत जीवनाचा काही संदर्भ आहे का याचा विचार करू.
सुरुवातीलाच आपण डॉ राउत साहेबांच्या पायाखालच्या डांबरी रस्त्याचा विचार करू… हा रस्ता डांबरी दाखवला आहे आणि तो डॉ राउत साहेबांच्या पाठीमागे लांबवर धूसर होत गेला आहे तसेच डॉ राउत साहेब रस्त्याच्या अगदी मधोमध चालत येतांना दाखवले आहे. याचा खुप गहन अर्थ मला यातून भावला आहे. कदाचित तो अर्थ या साहित्य कलाकृतीला साजेसा ठरावा असे मला वाटते. डॉ राउत साहेब ज्या रस्त्यावरून चालत आले आहे तो मागे गेलेला रस्ता हा धूसर झाला आहे. जे आमच्या पूर्वजांनी भोगले, ज्या हाल अपेष्ठा त्यांच्या वाट्याला आल्या, ते ज्या विषमतेच्या रस्त्याने जात होते तो रस्ता आम्ही आता धूसर केला आहे. म्हणजेच तो रस्ता आता आम्हाला दिसत नाही, भूतकाळातल्या व्यवस्थेने दगडधोंडे असलेला रस्ता आम्हाला दिला होता तो रस्ता शिक्षणाच्या भक्कम ताकदीने नव्याने बांधून जुना रस्ता मागे टाकुन आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या समतेच्या, बंधुता आणि न्यायाच्या रस्त्याने आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. पिढ्यांपिढ्यांपासून विषमतेने धुरकटलेला रस्ता मला साफ करायचा आहे.
माझ्या पायाखाली जो रस्ता आहे तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ नंतर आम्हाला चालण्यासाठी सुधारीत करून दिला आहे. त्या समतेच्या वाटेवरून मी माझ्या समाजाला नेण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच मी माझा रस्ता सोडून , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मला दिलेला मार्ग सोडून कुठल्याही बाजूने चालणार नाही. म्हनुनच की का्य रस्त्याच्या कडेला एक जाड रेषा दिसत आहे ती रेषा मला ओलांडून जायची नाही. ती मला बाबासाहेबांनी घालून दिलेली बंधनाची रेषा आहे आणि त्यामुळेच डॉ राउत साहेबांची प्रतिमा रस्त्यांच्या मध्यभागी चालतांना दाखवली असावी असे मला वाटते तसेच डॉ राउत साहेबांची प्रतिमा सुटाबूटात दाखवली आहे. याचा अर्थ असा की, डॉ बाबासाहेब जसे शिक्षणाने समृद्ध झाले, त्यांनी कासेची लंगोटी आणि कमरेची बोरकाटी काढून समाजाला सुटाबूटात आणले तो विचार समाजाला दिसावा, समाजाने आता बदलले पाहिजे हा विचार समाजाच्या नजरेस भरावा म्हणून डॉ राउत साहेबांची प्रतिमा सुटाबूटात दाखवली हा अर्थ मला इथे अभिप्रेत आहे. अतिशय अर्थपूर्ण आणि कल्पकतेने मुखपृष्ठकार, कलाशिक्षक सुरेशजी राठोड यांनी हे मुखपृष्ठ साकारले आहे.
यानंतर या रस्त्यांच्या कडेला एका बाजूला एक झाड आणि दुस-या बाजूला ठळक पाच झाडे दिसतात.. बाकी झाडे आहेतच पण पहिली पाच जी ठळक दिसतात त्यावर आपण जरा विचार करू.. एक बाजूला जे एकच झाड़ दाखवले आहे त्यात मला भगवान गौतम बुद्ध दिसतात आणि त्यांनी जी पंचशीलाची पाच तत्वे सांगितली आहे ती पाच झाडे अनुषंगाने आली असावीत. कोणत्याही जीवाची हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, व्याभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मद्य, आणि इत्तर मादक पदार्थाचे सेवन करणार नाही अशा पाच पंचशील डॉ राउत साहेबांनी एक एक शील सांभाळत पंचशिलाच्या प्रतिज्ञा करून हा मार्ग धरला आहे. ज्या प्रतिज्ञा आम्हाला भगवान बुद्धांनी घालून दिल्या आहेत त्या पंचतत्त्वाने आमचा समाज सुधारत चाललो आहे या अर्थाने ही पाच झाडे डॉ. राउत साहेब यांच्या मार्गात आली असावी असा मला गर्भित अर्थ यातून जाणवला आहे. या पाच झाडांनंतर जी झाडे दिसत नाहीत मात्र ती उभी असल्याचा भास होतो ती बुरसटलेल्या विचारांची, माणसाला माणूस म्हणून जगु द्यायचे नाही या विचारधारेची जी मानसिक वृत्ती होती त्याचे प्रतिक आहे. ते आम्ही केव्हाच आमच्या आकलनकक्षेच्या बाहेर सोडून आलो आहोत म्हणून ती आम्हाला दिसत नाहीत आणि आम्हाला ती बघायची देखील नाही या अर्थाने ती झाडे स्पष्ट दिसत नाही असे मला जाणवले.
यानंतर वर आकाशात सूर्य उगवतांना दाखवला आहे आणि काही पक्षी उडताना दाखवले आहे, याचा अर्थ असा की – हा सूर्य नव्या दमाचा आहे, नव्या युगाचा सूर्य समता, बंधुता, न्याय या मार्गाने जगाला बुद्ध विचारांचा प्रकाश पेरणारा आहे. डॉ राउत साहेब यांना मी या सूर्यात पाहतो. कारण त्यांचे कार्य हे समाजाला भुषणावह आहे, समाजाच्या लौकिकतेला उंचावर नेणारा आहे या अर्थाने हा सूर्य इथे घेतला असावा आणि म्हणुनच की काय, उच्च पदवी तसेच डॉक्टरेटची पदवी, बोधिसत्व एज्युकेशन आणि मेडिकल सोसायटी अमरावती या संस्थेचे अध्यक्ष पद भूषवित आहेत, तसेच वर काही पाखरे उडताना दाखवली आहेत याचा अर्थ असा की – जातियतेच्या, परंपरेने घालून दिलेल्या विषमतेच्या श्रुंखला तोडून ही पाखरे आसमंतात उंच भरारी घेत आहे. हा समाज पिचलेला होता, त्याचे पंख छाटलेले होते. त्या पक्षांना आता नव्याने पंख फुटले आहेत ते डॉ बाबासाहेबांच्या विचारांची शिकवण घेउन आकाशात उंच भरारी घेत आहे. या अर्थाने हे पक्षी येथे मुखपृष्ठकाराने घेतले असावे. इतका गहन अर्थ मला त्यात जाणवला.
यानंतर या कलाकृतीच्या शीर्षकाची बाजु आपण जाणुन घेऊ. जगावे एक पाउल पुढे या शीर्षकाला दोन रंगात वर अर्धा हिरवा आणि खाली अर्धा पांढरा असे घेतले आहे हे देखील मुखपृष्ठकाराने जाणीवपूर्वक घेतले असावे असे मला वाटते. वरचा हिरवा रंग या भुमीशी साधर्म्य दाखवतो ही सृष्टी सुजलाम सुफलाम रहावी, म्हणजेच माझा हा समाज सुख समाधानाने रहावा, त्याच्यात विचारांची हिरवळ यावी, हिरवळीने हा समाज बहरून एक एक पाऊल आनंदाने जगत जगत पुढे पुढे चालावे हा अर्थ तर खाली अर्ध्यात पांढरा रंग दाखवला आहे याचा अर्थ असा की, पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे. भगवान गौतम बुद्धानी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांना शांतीदूत म्हणून देखील संबोधले जाते या शांतीदुताच्या मार्गाने आमचा समाज एकेक पाउल पुढे टाकत स्वच्छपणे जगत आहे. पांढरा रंग स्वच्छतेचे प्रतिक आहे. आमचा मार्ग स्वच्छ आहे. कोणत्याही भ्रष्ट मार्गाने जाणार नाही. ज्या मार्गाने भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला शांततेचा संदेश दिला तो सम्यक मार्ग, शांतीचा मार्ग आम्ही अवलंबला आहे असा अर्थ मला येथे अभिप्रेत झाला आहे.
इतके सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ साकारले आहे. गौरव प्रकाशन यांनी गेली जवळपास १५ ते २० वर्षापासून साहित्य सेवा अविरत चालू ठेवली आहे. अनेक साहित्यिक त्यांनी प्रकाशझोतात आणले आहेत. त्यांनी जगावे एक पाउल पुढे या साहित्य कलाकृतीला जनमानसात विचारांची पेरणी करत आणले आहे. विकास, ज्ञान, उद्योग, व्यवसाय, अशा विविध कलागुणाचा अविष्कार म्हणजे डॉ. कमल मारोतराव राउत यांच्याजीवनावर आधारित जगावे एक पाउल पुढे ही कलाकृती होय. ही कलाकृती वाचक वर्गाला, व्यावसायिक, उद्योजक, साहित्यिक, लेखक यांना एक मार्गदर्शक ठरणारी कलाकृती ठरेल यात शंका नाही.
मा प्रकाशक, मुखपृष्ठकार कला शिक्षक सुरेश राठोड यांना पुढील साहित्य सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय डॉ कमल मारोतराव राउत यांना त्यांच्या पुढील दैदीप्यमान कारकिर्दिस लाख लाख शुभेच्छा…. आभाळाच्या उंचीच्या व्यक्तिमत्वाच्या मुखपृष्ठावर चार ओळी लिह्ण्याचे भाग्य लाभले… त्यात काही संदर्भ अनावधानाने चुकले असतील तर संपादक, वाचक माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.
- धन्यवाद….!
- प्रशांत एस वाघ (पॅसिफिक टायगर)
- संपर्क – तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
खुपखुप सुंदर लेखन
खुपखुप सुंदर लेखन
धन्यवाद सर
कुण्या कविने म्हटले आहे की
भेटलो नाही जरी
तरी दुःख नाही फारसे
एकमेकांना भेटण्यास
शब्द होतात आरसे
आपण माझ्या लेखनीला बळ दिले त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
सुंदर लेखन
खुपखुप सुंदर लेखन