गोल्ड फेशियलची चमक आता घरीच मिळवा.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    गोल्ड फेशियल करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर ३ गोष्टी वापरा आणि घरीच गोल्ड फेशियलची चमक मिळवा.

    फेशियल करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पर्ल फेशियल, गोल्ड फेशियल असे काही प्रकार एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी किंवा काही खास प्रसंगी केले जातात. फेशियलच्या इतर प्रकारांपेक्षा हे दोन प्रकार जरा जास्त महागडेही असतात. त्यातही पर्ल फेशियलपेक्षा गोल्ड फेशिअल करणे तर खूपच महाग जाते. म्हणून पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल आणि तेवढा वेळही नसेल, तर घरच्या घरी गोल्ड फेशियलचा लूक तुम्हाला निश्‍चितच मिळू शकतो.गोल्ड फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे केस पुर्णपणे मागे घ्या आणि बेल्टने बांधून टाका.यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.आता फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे चेहर्‍याचं क्लिंझिंग करणे.

    यासाठी तुमच्याकडे कोणतं क्लिंजर असेल तर ते वापरा किंवा मग सरळ कच्च्या दुधाचा उपयोग करा. कच्चे दूध हे सर्वोत्तम क्लिंजर मानले जाते. कच्च्या दुधाने चेहर्‍याला ५ ते ७ मिनिटे मसाज करा.यानंतर एक टेबलस्पून मध, अर्धा टेबलस्पून पिठी साखर आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस एकत्र करा. हे झाले तुमचे नॅचरल स्क्रबर तयार. या स्क्रबचा उपयोग करून चेहर्‍यावर ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. या उपायामुळे त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.चेहर्‍याचे स्क्रबिंग झाल्यानंतर चेहर्‍याला थोडी वाफ द्या. वाफ घेण्याच्या मशिनने वाफ घेणे शक्यतो टाळा. त्याऐवजी पातेल्यात पाणी टाकून ते उकळवा आणि पाण्याची वाफ घ्या. कारण मशिनने येणारी वाफ खूप जास्त तीव्र स्वरूपाची असते. सौंदर्याच्या दृष्टीने वाफ घेत असल्यास पातेल्यातून घेतलेली वाफ अधिक परिणामकारक ठरते.

    वाफ घेतल्यानंतर त्वचेची छिद्रे खुली होतात. त्यामुळे वाफ घेतल्यानंतर चेहर्‍याचे मॉईश्‍चरायझर आठवणीने करा. त्यानंतर दोन टेबलस्पून मध आणि अर्धा टेबलस्पून हळद हे मिर्शण एकत्र करा. याचा लेप चेहर्‍यावर लावा. हा झाला तुमच्या चेहर्‍यासाठीचा नैसर्गिक फेसपॅक. हा फेसपॅक चेहर्‍याला १५ ते २0 मिनिटे लावून ठेवा. यानंतर चेहरा धुवून टाका.चेहरा धुतल्यानंतर त्याला टोनर लावा आणि मॉईश्‍चरायझर लावा.या स्टेप्सनुसार घरच्या घरी तुम्ही गोल्ड फेशियल करू शकता.

Leave a comment