- वेगळेपण मला हवे आता…
- दुःख मी शोधतो नवे आता…
- माग भांडून मागणे अपुले,
- खूप झालीत आर्जवे आता…
- गातसे फौज मुर्ख भक्तांची,
- भोंदुचे नित्य गोडवे आता…
- जीव प्यारा नसेल तर यावे,
- हुकुमशाहीस आडवे आता…
- शांततेचा निरोप देणा-या,
- कबुतरांचे कुठे थवे आता…?
- ऊठ पेटून स्वाभिमानाने,
- सोड लाचार आसवे आता…
- संदीप वाकोडे