- चरकात लांब ऊस
- कढईत ताजा रस
- कढईच्या खाली जाळ
- झारी काढी मळी गाळ
- रस शिजे रट्ट रट्ट
- गाढा होई घट्ट घट्ट
- हौदामध्ये बुळ बुळ
- थंड होता होतो गुळ
- आकारास येती ढेपा
- बादलीत गूळ चेपा
- गुळ बने गुऱ्हाळात
- गोड वास शिवारात
- ऊस देई गूळ छान
- काळी माती देई दान
- युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता. बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227