- ज्योत पेटवून ज्ञानाची
- सारा भारत प्रकाशमान केला.
- स्त्री दास्य गुलामगिरीवर
- ज्ञानाचा आसूड ओढला.
- कर्मठ विषमतेच्या भटगिरीला
- अखरेचा इशारा दिला.
- ज्ञानाची महत्ती ओळखून
- नवा माणूस तयार केला.
- धर्मग्रंथाच्या बनावटगिरीची
- पोलखोल उगडी केला.
- अज्ञानी बांधवाच्या आयुष्यात
- माणुसकिची सूर्यपौर्णिमा आनला.
- शेतकऱ्यांच्या दुःखावरती
- माय होऊनी फुंकर घातला.
- शिक्षणाच्या झिरपत्या सिंध्दाताला
- आक्रमकतेने विरोध केला.
- अंधरूढीला धिक्कारुन
- समतामूलक समाज निर्माण केला.
- सावित्रीमाईच्या हस्तामध्ये
- नवक्रांतीची मशाल दिला.
- क्रांतीबा तू सकलजनाचा
- विद्रोहाची ज्वाला झाला.
- बिनमेंदूच्या विकृतेवर
- सत्यशोधकाचा वार केला.
- -संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००