केसांची वैविध्यपूर्ण रचना…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    केसांची वैविध्यपूर्ण रचना तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच खुमारी देऊन जाते. लूज वेव्ह्ज ठेवल्या तर क्लासी आणि एलिंगट लूक मिळतो. मुख्य म्हणजे यासाठी पार्लरची वारी करायला हवी असं नाही.

    घरच्या घरी कर्लिंग आयरनच्या मदतीने तुम्ही हा लूक मिळवू शकता. बीची वेव्ह्ज, लूज कर्ल्स हा चलतीत ट्रेंडही तुम्ही फॉलो करु शकता. हा वेवी लूक केसांच्या निम्म्या भागापासून सुरू होतो. पोनीटेल घालून केसांचा खालचा भाग कर्ल करुन तुम्ही हा लूक मिळवू शकता. यासाठी हेअर ड्रायर, पॅडल ब्रश, थर्मल प्रोटेक्टंग हेअर स्प्रे, कर्लंग आयरन, हेअर पिन्स आणि क्लप्सची गरज भासेल. हा लूक मिळविण्यासाठी सर्वप्रथम ब्लो ड्राय करा. ब्लो ड्राय करताना पॅडल ब्रशचा वापर करा.

    यामुळे केस मुलायम व चमकदार होण्यास मदत होईल. त्यानंतर कर्लिंग आयरनच्या मदतीने वेव्ह्ज बनवा. आजूबाजूचे केस ब्लो ड्राय करा. यामुळे कर्ली लूक मिळेल. कर्ल्स बराच काळ टिकून रहावे यासाठी पिनअप करुन ठेवा. नंतर क्लिप आणि पिन काढून मोकळे सोडा. हँड कोबिंग तंत्र वापरत हेअर स्प्रेने केस सेट करा.

Leave a comment