ऑफिसमधले फॅशनिस्टा बनताना

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

मित्रांनो, ऑफिसमध्ये कोणतेही कपडे विशेष करून कॅज्युअल वेअर ऑफिसमध्ये घालून जाणं चांगलं नाही. ऑफिसमधले फॅशनिस्टा बनताना या चुका तर करत नाही ना, जाणून घ्या..
एखाद्या कॉन्सर्टला गेला आहात. तिथे टी शर्ट किंवा जर्सी मिळाली. हा टी शर्ट किंवा जर्सी दुसर्‍या कॉन्सर्टला घालून जाऊ नका. ऑफिसमध्येही असा टी शर्ट घालू नका.ऑफिसमध्ये रिप्ड म्हणजे फाटलेली जीन्स घालून जाऊ नका. ही जीन्स कितीही कूल वाटत असली तरी घालण्याचा मोह टाळा. दाढी वाढवून विस्कटलेले केस घेऊन ऑफिसमध्ये जाऊ नका. ऑफिसमध्ये क्लिन शेव्हड लूकच कॅरी करा.
ऑफिसमध्ये शॉर्टस घालू नका. घरी किंवा बाहेरही शॉर्टस घालून फरत असलात तरी ऑफिसमध्ये शॉर्टस अजिबात घालू नका. क्रिकेट खेळताना किंवा कॅज्युअल आउटिंगला कॅप्स चांगल्या दिसतात पण ऑफिसमध्ये हा लूक चांगला दिसत नाही. त्यामुळे कॅप कितीही फंक असली तरी ऑफिसमध्ये घालू नका.
ऑफिसमध्ये घातल्या जाणार्‍या कपड्यांना नेहमी इस्त्री करा. कपड्यांच्या दोनच जोड्या असल्या तरी हरकत नाही. पण ते स्वच्छ, टापटिप असणं गरजेचं आहे.

Leave a comment