एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात.एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंग, महिलांसाठी महामंडळ २९ प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात.मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून स्मार्ट कार्ड तयार सवलत घेण्यात येत असल्याने केले जात असून एस टी महामंडळाला लाखो रुपयांचा फ्टका. बसत असल्याचे समोर आले आहे.

● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ……..

एस टी महामंडळाला सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे बसत आहे. बोगस कागदपत्रे सादर करून स्मार्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. कागदपत्रांची तपासणी न करता महामंडळ अनेकांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहे. सवलतीचा लाभ मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक देखील बिनधास्त या सवलतीचा लाभ घेत शासन व महामंडळाला लाखोंचा चुना लावत आहे. अशा प्रकारच्या सवलत योजनेचा फटका एस टी लाच बसतो असे नसून शासनाला देखील बसत असतो. सवलत योजनेचा पैसा एस टी महामंडळ सरकार कडून वसुल करत असते. आणि सरकार सवलत योजनेचा पैसा महामंडळाला देत असते.कर स्वरूपात जमा झालेल्या जनतेच्या पैशाचा हा अपव्यय असून फार मोठा भ्रष्टाचार आहे. सरकार क्या ज्या योजनांवर पैसा खर्च करते तो जनतेचाच पैसा.असतो. खाजगी प्रवासी वाहतुकीुळे एस टी महामंडळ अत्यंत घाट्यात असून महामंडळाचे. अधिकारी एस टी योजनेचा लाभ जनतेला मिळवून देत आहे.. सवलत योजनेमुळे एस टी ला प्रवाशी तर मिळतील शिवाय सवलतीचा पैसा देखील.मात्र या सर्व. प्रकारात जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून कोणतीही सवलत वापरण्याची व तपासण्याची यंत्रणेची गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक आगारात स्मर्ड कार्ड योजना राबवली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून बोगस कागदपत्रे सादर केली जात आहे. बनावट स्मार्ट कार्ड तपासन्याची कोणतीही यंत्रणा एस टी प्रशासनाकडे नसल्याने तसी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

एस टी मिळणाऱ्या सवलत योजनेवर एक दृष्टीक्षेप:

    १) अहिल्याबाई होळकर योजना – या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून मोफत प्रवास सवलत देण्यात येत आहे, ही सवलत आता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येतआहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे.
    २) विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास – १९८६नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत ६६.६७% आहे.
    ३)६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण व निम-आराम बसेसमध्ये ५०% सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही बसमध्येही ४५% सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी प्रतिवर्षी कमाल ४००० कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली आहे.
    ४) क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत – याआधी अशा रुग्णांना वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५०% पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता ७५% करण्यात आली आहे.
    ५)अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत- पत्रकारांना सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. मात्र आता आता वातानुकूलित शिवशाही बसेसमध्येही त्यांच्यासाठी १००टक्केसवलत लागू करण्यात आली आहे.
    ६) सिकलसेल ग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्णांना १०० % प्रवास सवलत देण्यात येत आहे.
    ७)सध्या १०० % अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५०% प्रवास सवलत आहे. मात्र आता ६५% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५०% सवलत मिळणार आहे.
    ८) कौशल्य सेतु अभियान – काळाच्या बैठकीत ही नवीन योजना लागू करण्यात आली असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परिक्षा (इ. १० वी)मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७ % टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे.

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

    ९५६१५९४३०६

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

    ——————–

आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

-बंडूकुमार धवणे

    संपादक गौरव प्रकाशन

 

    ——————–

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram