- विद्ये विना मती गेली
- मतीविना नीती गेली
- नितीविना गती गेली
- गतीविना वित्त गेले
- वित्ताविना रुद्र खचले
- इतके अनर्थ एका अविद्येने केले
अशी आपल्या काव्यातून बहुजन समाजाची विदारक परिस्थिती मांडणारे, एक उत्कृष्ट लेखक विचारवंत महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. ज्या व्यक्तीने शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाज, स्त्री शिक्षणासाठी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या व्यक्तीला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. ‘सत्यशोधक समाज’ नावाची संस्था स्थापन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम महात्मा फुलेंनी गेले. आपल्या मुलाचा महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह फुलेंनी आपल्या पत्नीच्या सहकार्याने लावला. कारण दत्तक पुत्र यशवंत हा विधवेचा मुलगा असल्याने समाज त्या मुलाला डावलून मुलगी देत नव्हता, पण फुले दांपत्याने दत्तक मुलाला न्याय मिळवून दिला. व समाजापुढे सर्वधर्मसमानतेचा आदर्श निर्माण केला.
ज्योतिबा केवळ नववर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. बाराव्या वर्षी त्यांचे लग्न सावित्रीबाई सोबत झाले. पण कौटुंबिक जबाबदारी सोबतच त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागविला. ज्योतिबा फुले हे अतिशय तल्लख बुद्धीचे होते. इंग्रजी माध्यमात शिक्षण पूर्ण करून सोबतच त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती या भाषाही आत्मसात केल्या. व भारत देश हा विविधतेत एकता असलेला देश आहे, त्यामुळे येथील सर्व भाषा, संस्कृती यांचा अभ्यास करणे हे आपले कर्तव्य आहे असे ते म्हणत होते.
स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरणारा खंबीर समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. कारण पूर्वी मुलींना शिक्षण देणे म्हणजे सोपे काम नव्हते. मनुवाद्यांचा स्त्री शिक्षणाला विरोध होता. पण महात्मा फुलेंनी न डगमगता स्त्री शिक्षणाची सुरुवात ही प्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यापासून केली. पत्नीला साक्षर करून प्रथम आठ मुलींना साक्षर करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी स्वतः खांद्यावर घेतली. व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळाला. शुद्रांसाठी शिक्षण खुले झाल्याने ज्योतिबांना घरून विरोध होऊ लागला. त्यांनी स्वतःचे घर सोडले पण आपले कार्य बंद पडू दिले नाही. परिणामी भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली व मनोवादी विचारसरणीला चपराक दिली. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ते महान विचारवंत होते. हंटर कमिशन समोर साक्ष देताना त्यांनी बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना प्राधान्याने शिक्षण द्यावे, बहुजन शिक्षकांना प्राधान्य द्यावे ,व्यावहारिक शिक्षणावर भर द्यावा, जीवनातील गरजा भागविणारे शिक्षण मिळावे या सर्व गोष्टीचा आग्रह धरला. व आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृह, व्हिक्टोरिया अनाथ आश्रम, केशव पणाची प्रथा बंद, विधवा पुनर्विवाह इत्यादी समाजपयोगी कार्य केले. महात्मा फुलेंनी शेतकरी, शेतमजूर, बहुजन यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी साहित्याचा मार्ग अवलंबविला. त्यांचे सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहे. आज फुलेंच्या स्मृतिदिनी या महान ध्येयवेढ्या शिक्षण तज्ञाला, समाज सुधारकाला मानाचा मुजरा . शिक्षणाची धगधगती मशाल पेटवून समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या थोर विचारवंताला कोटी कोटी प्रणाम ..!
- -अविनाश अशोकराव गंजीवाले (सहा शिक्षक)
- जि प प्राथ शाळा करजगाव
- पं स तिवसा
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–