उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या या ऋतूबदलाच्या काळात प्रावरणांच्या रंगांमध्येही बदल करावा लागतो. यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलर्स ट्रेंडमध्ये आहेत यावर एक नजर टाकू.
* मरून- प्रत्येक ड्रेस टाईपमध्ये या रंगाचं वेगळं स्थान आहे. या मान्सूनमध्येही हा रंग जलवा दाखवत आहे. या रंगाच्या शेड्सनी मनावर अधराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. या रंगामध्ये मॅक्सी, जंपसूट, ऑफ शोल्डर टॉप, रिफिल्स टॉप, कोल्ड शोल्डर टॉप आणि शॉर्ट ड्रेस टेंडमध्ये आहेत. * ग्रीन शेड- ताजेपणाचं प्रतीक म्हणजे ग्रीन शेड. हा रंग प्रत्येक वर्णाच्या व्यक्तीला खुलून दिसतो. यात वॉर्म टोनमध्ये मस्टर्ड ग्रीन कलर, खाक आणि डार्क ग्रीन कलर पसंत केले जात आहेत. ट्रेंडचा विचार कराल तर ब्राईट ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन कलरला महिलांची पसंती आहे. * पीच- काही फॉर्मल इव्हेंट्सना क्लासिक लूक हवा असेल तर हा कलर बेस्ट आहे. पीच कलरचा बेल स्लीव्हजचा ड्रेस खास लूक देऊ शकतो. * चॉकलेट ब्राऊन- हा रंग तरुणींच्या स्टायलिंगमध्ये नव्याने दिसून येत आहे. या सीझनमधल्या पार्टीसाठी चॉकलेट ब्राऊन कलरचा गाऊन हा सर्वोत्तम पर्याय आहे.