- * उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाभर निदर्शने
- * भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांची माहिती
अमरावती: अमरावती येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने दहशतवाद्यांनी त्यांची घंटा जवळ हत्या केली.कोल्हे यांच्या मारेकऱ्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली आहे.
उद्या भाजपा ग्रामीणच्या वतीने जिल्हाभऱ्यात मंडळ स्तरावर दि.४ रोजी उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण करन व मूक निदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी दिली आहे.उमेश कोल्हे यांच्या हत्येला महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली स्थानिक पोलिसांनी वेगळे वळण दिले होते परंतु एनआयएने हत्येचा खरा हेतू शोधला आहे.भाजपाच्या वतीने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली आहे.भाजपाच्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी व सजग नागरिकांनी उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा चौधरी यांनी केली आहे.