- उड पाखरा उड उंच आभाळी
- तुला उंच उडावच लागेल.
- नाही घेतली उंच भरारी,
- तर तुला भूतलावर पडाव
- लागेल.!
- भूतलावरची माणस आहे
- दुष्ट फार, येशील खाली
- गिळंकृत करतील तुला
- उघडे पडतील बाळ सारे
- म्हणुनी….
- तुला आपल्या पिलांना
- हृदयाशी जपावे लागेल..!!
- सोसिलास उन वारा
- पसरुनी पंख पिसारा,
- चोचीत पिलांना भरविले घास
- नयनात तुझ्या अश्रूच्या धारा,
- फिरुनी सारा शेत शिवारा,
- आतुनी दुःखी
- पिलांना …..
- बळ यावं यासाठी तुला
- हसावच लागेल…!!!
- झिजलाश तू परी तुझ्या पिलासाठी. फुटलेत त्यांना
- पंख आता….
- उडूनी गेले तुला सोडूनी दुरी,
- नाही कोणी आता घरी ना दारी
- शेवटी स्मृतींना घेऊनी उरी,
- जाशील किती उडूनी दुरी
- एका क्षणाला भू गर्भात तुला
- विसावा घ्यावाच लागेल.
- उड पाखरा उड उंच आभाळी
- तुला उडावच लागेल….!!!!
- -सुरेश राठोड
- (कलाशिक्षक)
- राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर.
- जि. नागपूर
- 9765950144