अस्वस्थ मनाची घालमेलं….!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
“काही व्यक्तींच्या आक्रमणातून राष्ट्र घडत असेल तर ते राष्ट्र हे राष्ट्रीय आदर्शाचे गुलाम ठरते.त्या माणसाच्या स्वप्नात आणि जीवन धारणात बंदिस्त होते.त्याच्या चिरकाल आशा आणि धर्म संकल्पनाच त्यांना देश वाटतात तेव्हा ते स्वतःच्या विश्वासालाच अप्रमाणिक असतात.शब्द आणि कृतीद्वाराही ते एका आत्मसंतुष्ट आणि परिग्रही प्रवृत्तीला पाठींबा देत असतात त्याचा पाठपुरावा करतात.”
       वॉल्टर लिपमन
मृग नक्षत्राचे काळे काळे मेघ नभात अवतरले होते.मोसमी वाऱ्याची चाहूल खगाना आली होती.नव्या जीवनाला नवे ऊर्जाबल देण्याचे काम मृग करत असतो.सारा प्रदेश गंधवाहानी मोहरून आला होता.पक्ष्यांची मंजूळ रव कर्णाला सुखावणारी वाटत होती .सारे खग स्वच्छंद गगनात विहार करत होते.काळे मेघ दिसताच त्यांनी आपला थव्याला घरट्याकडे वळवले होते.झाडाच्या पानातून नवं संगीताची धून ऐकू येत होती.निसर्गातील बदलत्या काळातील चक्र अविरत चालू आहे.पण मानवाचं चालणार चक्र कोरोनाच्या महामारीत थांबल आहे.अशा आल्हादायक वातावरणातही मानवी मनाच्या  अस्वस्थेत घालमेलं  होत आहे.सरकार नावाच्या ढोंगी मेंढूरूने आपले बँ बँ करणे सोडले नाही.या महामारीतील मृत्युचा खरा आकडा देऊ शकली नाही.निरंकूश राजसत्तेच्या लोभाने भारतीय नागरिकांनसोबत जो खेळ खेळला जात आहे तो खेळ चिड आणणारा आहे.लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे हे सरकार नसून लोकांच्या डोळ्यात कसे अश्रू येथिल याचा मेळ घालणारे सरकार आहे.अस्वस्थ मनाची घालमेलं होत आहे ती कोरोना विषाणूमुळे नाही तर ती सरकारच्या तुघलकी निर्णयाने होत आहे.
कोरोनाच्या महामारीत लोकांच्या जीवनातील आनंद लयास गेला आहे.बंदिस्त जीवनाची नवी व्यवस्था उदयास आल्याने सरकारला आपले हित साधण्यास  फायदा झाला आहे.देशातील आंदोलने बंद झाली आहेत.देशाचा पोशिंदा अनेक महिण्यापासून आंदोलन करत असतांना सरकारनं त्यांची दखलही घेत नाही.देशातील नागरिकांना अर्थहीन करून मुख्य समस्येला बगल दिली जात आहे.असत्याचे सारे रेकार्ड या सरकारच्या नावावर बनले गेले आहेत.विश्वगुरू नावाच्या मोहनीनं काही लोकांना फसवता येत पण काही माणसे या फसव्या शब्दावर विश्वास ठेवत नाही.जे सरकार कोरोना काळातील मृत्युचा आकडा सत्य सांगत नाही ते सरकार खरचं देशाला विश्वगूरू बनवणारं आहे का.? अशा खोट्या आश्वासनपासून  भारतीय नागरिक दक्ष राहतील अशी आशा आहे.
कोरोनाच्या महामारीत जे नागरिक मृत्युमुखी पडले ते भारतीय नागरिक नाहीत का ? त्याचे देश उभारणीत  सहकार्य नाहीत का ? देशातील जनतेला खोटी माहिती देण्यापेक्षा सत्य माहीती दिली तर त्यातून सरकारची पत सुधारू शकली नसती का ? सरकारने या फसव्या आकडेवाडीतून काय साध्य केलं आहे.आतातरी सरकारने खरी आकडेवाडी जनतेसमोर ठेवावी जे व्हायचं ते होईल .यातून लोकांना सत्यता समजून येईल.
आज सारा भारत रडत असतांना राजा मात्र खुश आहे.त्यांचा  अपेक्षित उद्देश सफल झाला आहे.देशात मृत्यूचे तांडव उभे असतांना समोरील गर्दीत त्यांची नजर दृश्यहीन झाली होती.अस्वस्थ मनाची घालमेलं त्यांना दिसत नव्हती.देशातील आक्रंदन ऐकू येत नव्हते.आज जी शांतता देशात दिसत आहे ही वादळापूर्वीची आहे. या अस्वस्थ मनातील लाव्हारस जेव्हा बाहेर पडेल तेव्हा विकृत राजतंत्राला भस्म केल्याशिवाय राहणार नाही.मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.देशात अशा दुःखी वातावरणात नवे प्रोजेक्ट उभे केले जात आहेत.हे प्रोजेक्ट  भारतीय माणसाचे रक्तशोषणावर उभे राहणार आहे.ते प्रोजेक्ट खरचं आपले असणार आहेत का?या प्रोजेक्टच्या भिंतीमधून कोरोना काळातील सरकारच्या हलगर्जीपणाने मेलेल्या मानवाचे चित्कार ऐकू येथिल.हे प्रोजेक्ट म्हणजे भारतीय जनतेच्या शोषणाचे प्रतिक ठरतील यात शंका नाही.
देश आज महाचक्रवातात सापडला आहे.लोकांचे रोजगार बुडाले आहेत. बेराेजगाराची संख्या वाढली आहे.सरकारी भर्ती बंद आहे.खाजगीकरणाने कामगाराचे शोषण होत आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र लयास गेलं आहे.ऑनलाईनच्या फंड्यानी गरीब विद्यार्थांचे मोठे नुकसान केलं आहे.श्रीमंत व गरीब विद्यार्थांची दरी वाढली आहे.छोटे उद्याेग,केसावर भांडे विकणारे लोक,फेरीवाले ,कामगार,घरकामवाली बाई,यांचे जगणं असह्य झालं आहे.देशातील सरकार कोरोनासोबत लढण्यापेक्षा विपक्षासोबत लढत आहे.कशात काय आणि फाटक्यात पाय अशी दशा शासकाची झाली आहे.बैल गेला अन् झोपी केला या वृत्तीने जर सरकार वागले तर तिसऱ्या लाटेत भारत नावाचा सुंदर देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही.देशातील नागरिकांना मोफत लस देण्याचं आश्वासन कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही.देश तिसऱ्या लाटेत जर आला तर सामान्य माणसाचे जीवन उध्दवस्त होईल म्हणून साऱ्या भारतीयांनो आता आपणच आपली काळजी घेऊया.असत्य पेरणाऱ्या अमाणूषतेवर जोतीरावाची अखंड प्रज्वलीत करूया.मृगाच्या जलसिंचनानी काळ्या आईच्या कुशीतं माणुसकिचं नवं बी पेरूया.आपण सर्याचे वंशज आहोत हे विसरू नका.वादळच्या वंशजाला हरवणे कुणालाही जमले नाही हे लक्षात ठेवा.अस्वस्थ मनातील घालमेलाला नष्ट करण्यासाठी लोकशाहीची महाऊर्जा कोळून पिऊया.अंधाऱ्या कोळोखमय साम्राज्यावर लोकशाहीचा सूर्यदीप प्रज्वलीत करूया.अस्वस्थ मनातील घालमेलं निर्माण करणाऱ्या कावेबाजापासून देशाची सुटका करू या.आम्ही भारताचे लोक …हा नारा बुलंद करू या. भारताला वाचवू या.तूर्ताश थांबतो….!
– संदीप गायकवाड
   नागपूर
   ९६३७३५७४००

0 thoughts on “अस्वस्थ मनाची घालमेलं….!”

Leave a comment