अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले.
जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी 25 मतदान केंद्राध्यक्ष व 75 मतदान अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष तहसीलदार योगेश देशमुख, तहसीलदार माया माने, तहसीलदार विश्वनाथ घुगे, मदन जाधव, धीरज स्थूल, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, नायब तहसीलदार ए. टी. नाडेकर, नायब तहसीलदार जी. जी. कडू, नायब तहसीलदार जितेंद्र पाटील, उपअभियंता एस. टी. वानरे, उपअभियंता पी. डी. सोळंके, के. ए. कवलकर यांच्यासह विविध विभागाच्या अधिका-यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मतदान अधिकारी म्हणून सत्यजीत थोरात, कैलास उमाळे व मनोज धुर्वे, चेतन मोरे, फारूख खान, प्रवीण कावळकर, आर. के. गडेकर, ए. बी. राजगुरे, जी. आर. इंगळे, अनंत पोटदुखे, परीक्षित गोस्वामी, राजेश मिरगे, अक्षय मांडवे, अनिल पोटे, ए. के. युसुफ, शंकर श्रीराव, परवेज पठाण, नीलेश उभाळे, अर्जुन वांडे, गजानन दाते, नीलेश ढगे, सुनील रासेकर, राजेश चोरपगार, धीरज गुल्हाने, प्रकाश बढिये, पी. पी. राठोड, प्रकाश भामत, आर. एल. बाहेकर, पी. एल. वानखडे, पी. एन. वैद्य, आर. बी. शेंडे, एच. एस. गावंडे, एस. डी. ढोक, पी. बी. वानखडे, जगन्नाथ गिरी, वाय. के. चतुर, एम. व्ही. रोकडे, एस. व्ही. पांडे, डी. जी. गावनेर, पी. एस. धर्माळे, बी. एस. तेलगोटे आदी विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.