अधुरा न्याय…!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

आज त्या अधिका-याजवळ भरपूर मालमत्ता होती. सर्व मालमत्ता ही भ्रष्टाचारानं मिळविलेली. त्याला सर्व कर्मचारी घाबरत होते. कारण तो गुंड्यांसारखी त्या कर्मचा-यांकडून खंडणी वसूल करायचा. एखाद्या कर्मचा-यांनं खंडणी न दिल्यास त्याला भयंकर त्रास दिला जाई. त्यांचा पगारही अनिश्चीत कालावधीसाठी बंद केला जाई. तसेच त्याच्या बढत्या, वरीष्ठ श्रेण्याही बंद केल्या जाई. तसा तो जाणूनबुजून कोणाच्याही वाट्याला जात असे. त्यात त्याला मजा वाटायची. नव्हे तर न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर अशा कर्मचा-यांकडून मिळालेल्या खंडणीतील दहा टक्के भाग इतर कोर्ट व पोलिसस्टेशनच्या कामासाठी तो अधिकारी खर्च करीत असे. हा त्याचा व्यापार जरी असला तरी त्याला व्यापार म्हणून सिद्ध करता येत नव्हतं. तो न्यायालयातील कमरा. सुहास पाय-या चढून तिथं आला होता. त्याला धाप लागली होती. कारण तो कमरा फारच उंचावर होता. त्यामुळं त्याला पाय-या चढाव्या लागल्या होत्या.
आज त्याच्या खटल्याला पंधरा वर्ष झाली होती. अद्यापही निकाल लागला नव्हता. आवबे लड्डू, जाव बे लड्डू करीत दिवस जात होते. त्याचबरोबर कामधंदाही जात होता. शिवाय पैसाही वाया जात होता. तसा सुहासला विचार येत होता की आपण असं काय केलं? सुहासची मुळीच चूक नव्हती. पण दुस-याच्या काडेलपणानं त्यालाच ते न्यायालयातील पाय-या झिजविण्याचे कष्ट झेलावे लागत होते. त्यामुळं त्याला दुःख वाटायचं त्या न्यायालयाच्या कामकाजावर……..त्याचबरोबर लोकांच्याही वागण्यावर. जे लोकं जाणूनबुजून लोकांच्या वाट्याला जात होते.
जग हे विशाल आहे. या जगात प्रत्येक माणूस वावरत असतांना त्याला साजेशी माणसं मिळत नाहीत. काही काही माणसं कोणी पुढं जात असल्यास त्याच्याशी नाहकच भांडण करुन त्याचे पाय खिचतात. नव्हे तर कोणाचा विकास कोणाला सहनच होत नाही. म्हणून हे जाणूनबुजून केलेलं भांडण असतं. काही काही तर न्यायालयाचे खटले व्यापार करण्यासाठी देखील करीत असतात. सुहास हा असाच व्यक्ती. स्वभावानं अगदी साधा भोळा व्यक्ती. तो लेखक होता. आपली लहान लहान आर्टीकल लिहून वर्तमानपत्रात छापत होता. तो तेवढा पुढं गेला नव्हता. पण नक्कीच तो कधीतरी पुढं जाईल व त्याचं हे आर्टीकल लिहिणं व त्याचं वर्तमानपत्रात छापून येणं हे काही मित्रमंडळींना आवडत नव्हतं.,तो नक्कीच एखाद्या दिवशी बराच पुढं जाईल असंही त्यांना वाटत होतं. मित्रांना वाटत होतं की सुहासनं असं लेखन करु नये. तसेच वर्तमानपत्रातून त्याचे लेखही छापून येवू नये. त्यामुळं की काय ती मित्रमंडळी त्याचा द्वेष करीत होती. सुहासचा द्वेष जसं मित्रमंडळ करीत होतं. तसाच द्वेष त्याच्या कार्यालयातील कर्मचारीही करीत होते. खासकरुन त्याचा अधिकारी. त्या अधिका-याला तर असं वाटत असे की जर सुहास वर्तमानपत्रातून जास्त प्रसिद्ध झाला, तर त्याला अडविणं बंद होईल. त्याच्यावर आपला वटहुकूमही चालवता येणार नाही. तेव्हा याला वेळीच रोकलेलं बरं.

अधिका-यानं तसा विचार केला व ठरवलं की काही काही कारणावरुन त्याला अडवायचं. म्हणजे तो नक्कीच वाद करेल व आपल्याला त्या वादातून सुहासला रोखता येईल. नव्हे तर त्याचा होणारा विकासही रोखता येईल. आता बस विचाराचा अवकाश……….एक दिवस अधिका-यानं शुल्लक कारणावरुन सुहासशी वाद केला. वाद एवढा विकोपाला गेला की अधिका-यानं सुहासवर हात उगारला. धक्काबुक्कीही झाली. त्यातच सुहास गंभीर जखमीही झाला. त्याच्या तोंडाला खरचटलं. पायालाही लागलं. त्यानंतर थोड्या वेळानं भांडण बंद झालं. सुहास विचार करीत होता त्या घटनेवर. कारण यापुर्वीही त्या अधिका-यानं बरेच वेळा भांडण केलं होतं. फरक एवढाच होता की त्या वेळच्या भांडणात हात उगारला नव्हता. पण आता एवढी हिंमत वाढली होती की चक्क अधिका-यानं त्याचेवर हात उगारला. सुहास विचार करु लागला की आज अधिका-यानं हात उगारला. उद्या जीवही घेईल. नाही यावर आता आपण चूप बसू नये. कारण आज जर चूप बसलो तर उद्या प्राणावर बेतू शकते. शेवटी त्यानं आपल्या नोकरीचा विचार केला नाही व पोलिसस्टेशनला त्या अधिका-याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसस्टेशनला सुहासनं तक्रार दाखल केली खरी. पण पोलिसवाले साधे चौकशीलाही आले नाही. परंतू त्यांनी फोन करुन त्या अधिका-याला बोलावलं. त्याला तक्रार समजावून सांगीतली व पैसे घेवून तक्रार दाबून टाकली. पण सुहास काही चूप बसला नव्हता. तो पुन्हा पोलिसस्टेशनला गेला. काय झालं ते त्यानं विचारलं. तशी त्यानं वरीष्ठ अधिकारी वर्गाकडं तक्रार दाखल केली. जशी त्यानं वरीष्ठ अधिकारी वर्गाकडं तक्रार दाखल केली. तसे पोलिस चौकशीला आले. त्यावेळी पुरते एक दोन महिने उलटून गेले होते.
दोन महिन्यानंतर चौकशीला आलेले पोलिस. त्या पोलिसांना दोन महिन्यानंतर काय मिळणार होतं. त्यांना चौकशीनंतर काहीच मिळालं नाही. तरीही खटला न्यायालयात उभा राहिला. न्यायालयात या खटल्यावर फैरीवर फैरी झडत राहिल्या. सुहासच्या बाजूनं असलेला सरकारी वकील पाहिजे त्या प्रमाणात पाठपुरावा करीत नव्हता. अधिका-याजवळ भ्रष्टाचारानं कमविलेला अतोनात पैसा. त्याची पोलिसांशी हातमिळवणी केलेली. एवढंच नाही तर सरकारी वकीलही मैनेज झालेला. शेवटी साक्षीदाराची साक्षही चालली नाही व सुहासला पराभव पत्करावा लागला. सुहासची केस खरी होती. पण त्याला न्याय मिळाला नाही. ती केस अधुरी राहिली असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण केसचा निकाल लागूनही सुहासला काहीही माहित पडलं नाही.
आज केसचा निकाल लागून दोन वर्ष झाले होते. अचानक सुहासच्या घरी पोलिस समन्स घेवून आले. समन्सवर काहीही लिहिलं नव्हतं. मात्र गुन्हेगार पार्ट्यांची नावं लिहिलेली होती. यात संबंधीत चौकशी करणा-या संपूर्ण पोलिस अधिका-यासह त्या अधिका-यानं सुहासच्या साक्षीदारालाही पार्टी केलं होतं. सुहास विचार करीत होता. माझ्यावर केस टाकणं ठीक आहे. पण साक्षीदार आणि चौकशी करणारे पोलिस अधिकारी. ही बाब विचार करायला लावणारी होती.कारण एखाद्या खटल्यात कोणी साक्षच देणार नाही, तर खटला जिंकायचा कसा? तसेच जर अधिकारी पोलिस वर्गही साधी चौकशी करणारच नाही तर न्याय कसा मिळेल? अधिकारी वर्गाचं ठीक. पण साक्षीदाराला गोवणं ही गोष्ट देखील विचार करायला लावणारी होती. जो व्यक्ती ख-या अर्थानं बदमाश्या करुन गेला. तोच व्यक्ती आज उलटा चोर कोतवाल को दाटे या म्हणीअंतर्गत शिरजोर बनून सुहासवर भारी झाला होता. हे सर्व न्यायालयातून आरोपीला मिळालेल्या न्यायानं घडलं होतं.

आज जेष्ठ मंडळी न्यायालयात जावू नका असा सल्ला देत असतात. कारण तिथं वाळलंही जळतं आणि ओलंही जळतं असं म्हटलं जातं. ते अगदी बरोबर आहे. कारण कधीकधी न्यायालयाच्या काही भुमिकेनं जो त्रास आरोपी नसलेल्या माणसाला आरोपी बनवून दिला जातो. तो त्रास असहनीय असतो. ज्याच्याजवळ जास्त पैसा. न्याय त्याच्याचकडे झुकतो. कारण ज्याच्याकडे जास्त पैसा. तो व्यक्ती जास्त पैशाचा वकीलही खरेदी करु शकतो. तसेच पोलिसस्टेशन आणि साक्षीदाराशीही हातमिळवणी करीत असतो.
चांगले व्यक्ती हे कधीच न्यायालयात दाद मागायला जात नाहीत वा पोलिस स्टेशनलाही जात नाहीत. पण जे बदमाश असतात किंवा ज्यांचा व्यापार असतो. ते सतत न्यायालयाचा वा पोलिसस्टेशनचा दरवाजा ठोकत असतात. जसा सुहासचा अधिकारी. सुहासचा अधिकारी हा कोणत्याही कर्मचा-याशी भांडण करीत असे नव्हे तर तो प्रत्येकाची तक्रार पोलिसस्टेशनला करीत असे. त्यातच काहींना इंन्क्रीमेंट व बढत्या लावत नसे. तर काहींशी शुल्लक कारणावरुन भांडत असे. कधीकधी पगार बंदही करीत असे. हे सर्व प्रकार जाणूनबुजून होते. पण या प्रकारावर वरीष्ठ अधिकारीही त्याची अडवणूक करीत नसल्यानं त्याची हिंमत वाढली होती. समजा यात एखाद्या कर्मचा-यानं न्यायालयात खटला टाकलाच. तर गुंड्यांसारखी तो खंडणी वसूल करायचा. आलेल्या रकमेतून दहा टक्के रक्कम तो अधिकारी खटल्यासाठी खर्च करायचा व बाकी उरलेला पैसा हा स्वतःजवळ जमा करायचा. असं करुन त्यानं भरपूर मालमत्ता गोळा केली होती.
आज पंधरा वर्ष झाले असले तरी अजूनही सुहासला बरीच प्रतिक्षा करावी लागणार होती. कारण न्यायालयीन जगतात दोषींना ख-या अर्थानं न्याय मिळत होता आणि जे दोषी नव्हते. त्यांनाच शिक्षा भोगाव्या लागत होत्या. नव्हे तर ह्या न्यायालयातील सात मजल्यावरच्या पाय-या चढणं ही देखील एक शिक्षाच होती. न्यायालय पुरावे मागत होते. पण दोन महिने झाल्यावर सुहासचा खटला दाखल झाल्यानं व पुरावे दोन महिने कालावधीत नष्ट झाल्याने सुहास पुरावे देवूच शकत नव्हता. म्हणूनच ही केस लांबली होती.
दिवसेंदिवस सुहास खंगत चालला होता.,आता त्याचं वयही झालं होतं. त्याला पाय-या चढणंही कठीण होत चाललं होतं. ज्यानं गुन्हा केला होता. तो अधिकारी तारखेच्या दिवशीही घरातच एसीमध्ये बसून आराम करीत होता. तर ज्याचा गुन्हा नव्हता, तो सुहास न्यायासाठी कोर्टाच्या पाय-या झिजवीत होता. अशातच एक दिवस सुहासला न्यायालयाचीच पायरी चढतांना अटैक आला व तो गतप्राण झाला. सुहास गतप्राण झाला असला तरी त्याला न्याय मिळाला नाही. नियती हे सर्व पाहात होती. तो जेव्हा गतप्राण झाला. ती गोष्ट अधिका-याला माहित झाली. तो हर्षोल्लासानं हसायला लागला आणि काय आश्चर्य त्याच हर्षोल्लासात त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्याला अर्धा पक्षाघात मारला होता.आज अधिकारी पलंगावर होता. त्याला उठता बसता येत नव्हतं. जाग्यावरच त्याचं विष्ठा करणं सुरु होतं. त्याला स्वतंत्र्य कमरा दिला होता. त्या कम-याची फार वास येत असल्यानं कोणी तिकडं भटकत नव्हतं. तो विष्ठेच्या थारोळ्यात जुने दिवसं आठवीत पडलेला राहायचा. जेव्हा त्याला ते जुने दिवसं आठवायचे. तेव्हा मात्र नक्कीच त्याला पश्चाताप व्हायचा. तो जरी पैशानं न्याय विकत घेवून अधुरा न्याय ठेवत असला तरी नियतीनं त्याच्या अंतिम समयी पूर्ण न्याय केला होता. तो मरण मागत होता. पण त्याला मरणही येत नव्हतं.

    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०

Leave a comment