अण्णाभाऊ साठे हे एक अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावीत झाले होते. त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं होतं.अण्णाभाऊ साठेचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होतं. त्यांचा जन्म १ आगष्ट १९२० रोजी झाला होता. त्यांचा जन्म सांगलीचा. ते समाजसुधारक, लोककवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही जगतात गाजत आहे.अण्णा हे आंबेडकरवादी व मार्क्सवादी विचारसरणीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला व नंतर ते आंबेडकरवादी झाले. ते शिक्षण शिकले नाही. अर्थात कोणत्याच शाळेत गेले नाही. तरीही ते शाहिर, कादंबरीकार व कथाकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या आईचे नाव वालबाई होतं. तर पत्नीचे नाव जयवंता. त्यांच्या पत्नीला कोंडाबाई देखील म्हणत असत.अण्णा हे मातंग समाजाचे असून त्या काळी होत असलेल्या भेदभावाचे चटके ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना बसले. तसेच ते अण्णांनाही बसले. म्हणून की काय, अण्णा फक्त दिड दिवसच शाळेत गेले व नंतर शाळा सोडून दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वाण झाल्यानंतर १९५८ मध्ये पहिलं दलित साहित्य संमेलन भरलं. त्या दलित साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना अण्णा म्हणाले, ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.’ महत्वाचं म्हणजे त्यांनी दलित व शोषीत(कामगार) यांचं महत्व केवळ साहित्य संमेलनच नाही तर प्रत्येक ठिकाणी तसेच साहित्यातही विषद केलं. त्यांच्या मतानुसार दलितांमधूनही लेखक तयार व्हावे व त्या लेखकांनी दलितांना हिंदू प्रजातीच्या अत्याचारापासून मुक्त करावे. अर्थात त्या अत्याचाराबाबत आपल्या लेखनीतून आवाज उठवावा. अण्णांनी एकुण पसतीस कादंब-या लिहिल्या. त्यामधलीच फकीरा एक. ती १९५९ मध्ये लिहिली. त्यांनी शाहिरी देखील केली नव्हे तर शाहिरीतूनही त्यांनी जगाचं उदबोधन केलं. फकीरामध्ये ब्रिटीशांच्या अत्याचाराच्या विरुद्ध लढणारा नायक उभा केला. ज्या नायकाला ब्रिटिश सरकार शेवटी फाशी देतांना दाखवले आहे.
अण्णाबाबत विशेष सांगायचं म्हणजे ज्या दिवशी लोकमान्य टिळक मरण पावले. त्याच दिवशी अण्णा जन्माला आले. जणू टिळकांचे कार्य अपूरे राहिले होते की काय? परंतू टिळक हे उच्च जातीत जन्माला आले होते तर अण्णा हे कनिष्ठ जातीत. पण विचारांबाबतीत दोघांमध्येही समानताच होती. दोघांनाही ब्रिटीशांचा रागच होता. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. त्यांनी ब्रिटीशांच्या अत्याचाराविरुद्ध केसरी व मराठा मधून अनेक लेख लिहिले तर अण्णांनी फकीरा. मात्र विटाळाचे चटके जे अण्णांना भोगावे लागले. ते टिळकांना भेगावे लागले नाही. अण्णांनी अनेक साहित्यप्रकार हाताळले. ते कुशल राजकारणीच नाही तर एक थोर समाजसुधारकही होते. त्यांचा सुधारकाचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते अशिक्षित जरी असले तरी त्यांनी जे विपूल लेखन केलं. त्यावरुन त्यांच्यापासून बराच बोध घेता येण्यासारखा आहे. अण्णा हे काही जास्त दिवस जगले नाहीत. ते १८ जुलै १९६९ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकोणपन्नासव्या वर्षी मरण पावले. परंतू ते अल्प काळ जरी जगले असतील तरी त्यांनी केलेले कार्य हे इतरांना लाजवेल असेच आहे. त्यांच्या एक आगष्टच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०