तोंडाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी वेळोवेळी दातांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. समग्र आणि सर्वसामान्य अशा दंतचिकित्सेच्या दोन पद्धती आहेत. समग्र दंतचिकित्सेत तोंडाच्या सर्वांगिण आरोग्यावर भर दिला जातो तर सर्वसामान्य दंतचिकित्सेत फक्त हिरड्या आणि दातांवर उपचार केले जातात. समग्र दंतचिकित्सेनंतर रुग्णांना तोंडाच्या आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यातही सुधारणा जाणवली. या प्रक्रियेमुळे तोंडाच्या विकारांमागचं मूळ कारण जाणून घ्यायला मदत होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सर्वसाधारण दंतचिकित्सेत रसायनांचा वापर केला जातो. त्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. मात्र समग्र दंतचिकित्सेच्या बाबतीत असं होत नाही. यात सुरक्षित घटकांचा वापर केला जातो. सर्वसाधारण दंतचिकित्सेत पार्यासारख्या विषारी धातूचाही वापर होतो. त्यामुळे अनेकजण समग्र दंतचिकित्सेकडे वळू लागले आहेत.