- एका क्षणात लष्कराच्या
- हेलिकॉप्टरचा झाला घात
- एक नव्हे एकूण तेरा
- दिग्गज ठार झाले त्यात
- शोकाकुल झाला देश
- दुःख सागरात बुडाला
- तडा कसा गेला असेल?
- कणखर अभेद्य गडाला
- जंग जंग पछाडणारे
- सापडले कसे जाळ्यात?
- विरश्रीची माळ असायची
- नेहमीच त्यांच्या गळ्यात
- दृश्य पाहूनच काटा यावा
- सारं अंग शहारून जावं
- होत्याचेही नव्हते झाले
- ओसाड संसारांचेही गावं
- गर्जनेने हादरुन सोडणारा
- सिंह होता बिपिन रावत
- शत्रुंच्या अंगावरती मोठ्या
- धाडसाने जायचा धावत
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१