- आज वचन द्यायचे
- मज माझिया देशाला ।
- रक्त सांडणार माझे
- सदा देश रक्षण्याला ।।
- माझ्या शब्दाने कोणाला
- कधी दुखविणे नाही ।
- जना आनंद द्यायचे
- कुणा फसविणे नाही ।।
- माझ्या होणाऱ्या पत्नीस
- आहे द्यायचे वचन ।
- तिचे अवघ्या जगती
- प्रिय असेल वदन ।।
- माझ्या पालकांना कधी
- नाही दुःखात ठेवणे ।
- मज त्यांच्या सुखासाठी
- आहे देह झिजवणे ।।
- मातृभूमी प्रिय मज
- जिणे गुणगान गात ।
- सदा माणुसकीसाठी
- पुढे असणार हात ।।
- माझ्या कर्तव्याशी सदा
- राहणार प्रामाणिक ।
- अधिकार मिळविण्या
- नाही मागणार भीक ।।
- शक्य तेवढे प्रयत्न
- माझे मुलं घडविण्या ।
- त्यांना शिक्षणामधून
- माणुसकी दाखविण्या ।।
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७