- प्रिये वाटते आज रातीला
- तुझ्या संगें लगीन करावे
- लग्नास सखे सोबती
- असतील चंद्रमा वरहाडी
- असतील लुकलुकणारे
- तारे आणि साक्षीस
- असेल निळेभोर आकाश
- आणि चमकणारे काजवे
- मध्येच पावसाची एक
- सर यावी व अक्षदा
- म्हणून दोघांवर कोसळावी
- आणि मध्येच एक तारा
- तुटावा आणि आपल्या
- मीलनाचा बहाना होवोवा
- व रातसंध्याचा कुशीत
- विसावा व नव्या स्वप्नांची
- पहाट व्हावी गवतावर
- जसे दवबिंदू पडावे
- प्रा. संदिप रामदास मोकळे
- कांचनवाडी, औरंगाबाद