रोजच्या आयुष्यात राग येणं अगदी स्वाभाविक आहे. पण रागावर नियंत्रण मिळवणंही तितकंच गरजेचं आहे. रागाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर नातेसंबंधांवरही होतो. त्यामुळे रागाचं व्यवस्थापन करण्याच्या या टिप्स तुमच्या कामी येतील.
तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीत राग येतो किंवा काही गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर चिडचिड होते. मात्र उगाचच रागविण्यापेक्षा किंवा चिडचिड करत बसण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे. समस्या कितीही जटील असली तरी सुटू शकते. त्यामुळे समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.रागाच्या भरात आपण बरंच काही बोलून जातो. या शब्दांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि नात्यांवर परिणाम होतो. त्यामुळे राग आल्यावर फार बोलू नका. शांत व्हा. राग कमी झाल्यावर स्वत:च्या भावनांना वाट करून द्या. शांतपणे चर्चा करा. आपली समस्या, प्रश्न किंवा व्यथा शांतपणो मांडा.
राग येण्यामागच्या कारणांचा शोध घ्या. विशिष्ट प्रसंगी किंवा ठराविक कारणांमुळे राग येत असेल तर त्यावर उपाय शोधा. उगाचच रागवू नका. यामुळे तुम्ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकाल. तसंच तुमच्या हातून कोणतीही चुकीची कृती घडणार नाही.
राग आल्यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची हे ठरवा. राग आल्यावर आपण नेमकं काय करतो, कशा प्रकारे वागतो, आक्रस्ताळेपणा करतो का, याचा आढावा घ्या. आपल्या चुकांचं विेषण करा. यामुळे रागावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं जाईल.