आता उन्हाचा कहार वाढतो आहे. पुढचे दोन महिने वाढत्या उष्म्याला सामोरं जाण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे या काळात शरीराला येणारा घामाच्या दुर्गंधीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजायला हवे. याकामी टाल्कम पावडर उपयुक्त ठरु शकते. याखेरीज अन्य कामांसाठीही ती उपयुक्त ठरते. केस तेलकट असतील तर चांगला श्ॉम्पू यावरील उपाय ठरु शकतो. मात्र केस अति तेलकट असतील तर अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी केसांच्या मुळांपाशी टाल्कम पावडर भुरभुरा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.
मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांवर टाल्कम पावडर भुरभरावी. यामुळे मस्कारा एकसारखा पसरतो. लिपस्टिक सेट करण्यासाठी आणि लाँग लास्टिंग इफेक्ट मिळवण्यासाठी टाल्कम पावडरचा उपयोग होतो. लिपस्टिक लावून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर थोडी पावडर घ्या आणि हा पेपर ओठांवर दाबून धरा. आता परत लिपस्टिकचा हलका कोट द्या. यामुळे लप कलर अधिक काळ टिकतो. वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचा मुलायम व्हावी या उद्देशाने टाल्कम पावडर लावली जाते. पावडरमुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होतो आणि लव समुळ निघते.आता उन्हाचा कहार वाढतो आहे. पुढचे दोन महिने वाढत्या उष्म्याला सामोरं जाण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे या काळात शरीराला येणारा घामाच्या दुर्गंधीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजायला हवे. याकामी टाल्कम पावडर उपयुक्त ठरु शकते. याखेरीज अन्य कामांसाठीही ती उपयुक्त ठरते. केस तेलकट असतील तर चांगला श्ॉम्पू यावरील उपाय ठरु शकतो. मात्र केस अति तेलकट असतील तर अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी केसांच्या मुळांपाशी टाल्कम पावडर भुरभुरा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.
मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांवर टाल्कम पावडर भुरभरावी. यामुळे मस्कारा एकसारखा पसरतो. लिपस्टिक सेट करण्यासाठी आणि लाँग लास्टिंग इफेक्ट मिळवण्यासाठी टाल्कम पावडरचा उपयोग होतो. लिपस्टिक लावून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर थोडी पावडर घ्या आणि हा पेपर ओठांवर दाबून धरा. आता परत लिपस्टिकचा हलका कोट द्या. यामुळे लप कलर अधिक काळ टिकतो. वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचा मुलायम व्हावी या उद्देशाने टाल्कम पावडर लावली जाते. पावडरमुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होतो आणि लव समुळ निघते.