- * श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या गौरवात भर
- * विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची प्रेरणा सर्व शिक्षकांना मिळावी – श्री हर्षवर्धन देशमुख
- * महाविद्यालयाच्या उपक्रमशील अध्यापन पद्धतीचा हा सन्मान – प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या विविध उपलब्धींमध्ये पुन्हा एक भर पडली आहे. महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ पंकज नागपुरे यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा समजला जाणारा “इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स – दिनबंधू साहू स्मृती पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
पाटलीपुत्र विद्यापीठ, पटना (बिहार) येथे आयोजित इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आयएपीटी) या नामांकित संस्थेच्या वार्षिक संमेलनात पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांनी स्विकारला. आयएपीटी ही एक राष्ट्रीय स्तरांवरील भौतिकशास्त्र शिक्षक संघटना आहे, जी संपूर्ण देशात विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून भौतिकशास्त्र अध्यापन आणि भौतिकशास्त्र शिक्षकांचा स्तर वृद्धिंगत करण्याचे काम करते. प्रथमच राज्यातील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला हा पुरस्कार मिळाला असून यापूर्वी हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्व प्राध्यापक आयआयटी सारख्या नामवंत संस्थांमधील होते. पदवी स्तरावरील आपल्या प्रयोगशील अध्यापन, नाविन्यपूर्ण कृतीयुक्त अभ्यासक्रम आणि समाजोपयोगी संशोधन अश्या तीनही पातळ्यांवर अमूल्य योगदानामुळेच त्यांनी आपले या पुरस्कारावर नाव कोरले आहे.
एका राष्ट्रीय संस्थेद्वारा हा पुरस्कार जाहीर झाल्याबरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धन देशमुख यांनी डॉ नागपूरे यांचे कौतुक करीत संस्थेच्या इतर प्राध्यापकांसाठी प्रेरणादायक उपलब्धी मिळविल्याबद्दल विशेष अभिनंदन केले होते. महाविद्यालयाच्या उपक्रमशील अध्यापन पद्धतीचे द्योतक संपूर्ण समाजापर्यंत या निमित्ताने पोचल्याची गौरव भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे यांनी यावेळी व्यक्त केली. या पुरस्काराच्या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारी सदस्य, आजीवन सभासद, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ बरडे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी डॉ नागपुरे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–