प्रत्येक नागरिकांपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोहचवून, डॉ. आंबेडकर जयंती साजरी करूया…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    नुकताच नागराज पोपटराव मंजुळे यांचा झुंड प्रकाशित झाला आणि परत एकदा जयभीमचा नारा दुमदुमला व डॉ भारतरत्न डॉ. बाबासाहेब सर्व नागरिकांन पर्यंत पोहचले.
    आपण किती कोत्या मनाचे आहोत की, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जयभीमवाल्यांचेच. जयभीमवाल्यांनीच डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करायची काय तर डॉ आंबेडकरांचे कार्य हे फक्त जयभीम वाल्यांसाठीच होते.अश्या बऱ्याच गैरसमजुतीतून आपण जात असतो. परंतु वास्तविक बघता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच होते व त्यांनी सर्वांसाठीच कार्य केले आहे व ते सर्वांचेच आहेत. त्यांना आपणाला ओळखता आले नाही किंवा त्यांना सर्वांपर्यंत पोहचवू देण्यात आले नाही. त्यांच्या कार्याची महती ही विश्वंभरात आहे. एव्हढेच नाही तर हा देश डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचा आहे असे सुद्धा म्हटले जाते.

    ज्या महामानवाची महती व कार्य विश्वातओळखल्या जाते परंतु आपल्या देशात मात्र ह्या महामानवाला जसे ओळखल्या जायला पाहिजे होते, अभासल्या जायला पाहिजे होते व पुजल्या जायला पाहिजे होते त्याप्रमाणे होत नाही. केवळ १४ एप्रिलला धुमधडाक्यात जयंती साजरी करतात.काय केले ह्या महामानवाने सर्वसामान्यांसाठी, प्रत्येक नागरिकांसाठी, तर समानतेचा हक्क मिळवून दिला, पूर्वी पुरुषांना जास्त वेतन मिळायचे व स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी, परंतु घटनेत तरतूद करून स्त्री पुरुषांना समान वेतन, समान कामाचे तास सर्वाना मतदानाचा अधिकार पूर्वी आपल्या देशात होते. परंतु स्त्रियांचे मतदान त्यांचा पती करायचा. डॉ. बाबासाहेबानी घटनेत तरतूद करून समान मतदानाचा अधिकार स्त्रियांना बहाल केला.

    आज आपण भाक्रा नांगल ह्या धरणाचे पाणी पितो त्यावर कृषी उत्पादन घेतो व देश सुजलाम सुफलाम करतो तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. ते प्लांनिंग कमिशनचे मुख्य होते तेव्हा त्यांनी धरणे बांधण्याच्या शिफारशी केल्या होत्या. आपल्या देशाची आर्थिक घडी बसविण्याचे व सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका नियंत्रण बँकेची गरज होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज ह्या ग्रंथाच्या आधारे रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. आज देशात हीच बँक आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवते आहे. ह्याच बँकेमुळे आपण नोटबंदी यशस्वीपणे राबवू शकलो. हीच बँक सर्व शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी सूचना देऊन अल्पव्याज दराने पतपुरवठा करीत असते.

    आज कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाचे कार्य केले आहे. अगोदर कामगारांना १८ १८ तास काम करावे लागत असे. डॉ. आंबेडकरांमुळे आज ८ तासपर्यंतच कामाचे तास करण्यात आले आहेत.
    आज गरज आहे डॉ. आंबडेकर आपल्या प्रत्येक नागरिकांन पर्यंत पोहचविण्याची, अभ्यासण्याची तरच आपला देश सुजलाम सुफलाम होईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

    अरविंद सं.मोरे,
    नवीन पनवेल
    मो.९४२३१२५२५१.

Leave a comment