धम्मध्वज बुद्धाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात नव्हता. त्रिपिटकातही त्याचा उल्लेख नाही. अशोकाच्या काळातही बौद्ध धाम्मध्वज नव्हता.
१९ व्या शतकात श्रीलंका येथे ब्रिटीशांची राजवट होती. तेथे ख्रिश्चन देशाचे साम्राज्य होते. त्याचकाळात दि. २६ व २७ आगस्त १८७३ रोजी कोलंबो येथे ख्रिश्चन धर्मगुरू आणि बौध्द भिक्खू यांच्यांमध्ये शास्त्रर्थावर चर्चा झाली. त्या चर्चेत सहभागी बौध्द प्रतिनिधी भदंत गुणानंद होते तर ख्रिश्चन धर्मगुरू सिल्वा पादरी होते. या चर्चेत बौध्द गुरु गुणानंद विजयी झाले. ही वार्ता त्यावेळच्या सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली.
ही बातमी वाचून अमेरिकेचे कर्नल हेन्री स्टील आलकाट, जान डेव्हिड, रशियाच्या श्रीमती ब्लावत्साकी सारखे विद्वान बौद्ध धर्माकडे प्रभावित झालेत. या सर्वांची इच्छा भदंत गुणानंद यांची भेट घेण्याची झाली. पुढे त्यांची भेट झाल्यावर बौद्ध धर्माच्या प्रभावाने प्रेरित होऊन जान डेव्हिड यांनी श्रीलंका येथेच बौद्ध धम्म स्वीकारून स्वत:चे नाव अनागारिक धम्मपाल असे केले. अनागारिक धम्मपालच्या पाठोपाठ हेन्री स्टील हे सुद्धा गुणानंद यांना भेटायला सिंहली येथे आले. दोघांनीही बौद्ध धम्माची दीक्षा भदंत गुणानंद यांच्या हस्ते घेतली. त्याच काळात भारतातील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे ब्राम्हणांच्या ताब्यात होते. या सोबत भारतावर इंग्रजांचे राज्य होते. या सर्वांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी ध्वजाची गरज असते. ध्वज हातात घेवूनच मोर्चा पुढे आगेकूच करीत असतो. धार्मिक कार्यात ध्वजाचे फार मोठे महत्व असते.यास्तव भदंत अनागारिक धम्मपाल आणि हेन्री स्टील यांनी १८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगातील विद्वान लोकांची सभा बोलाविली. त्या सभेत खालील व्यक्ती आवर्जून उपस्थित होते.
१) कर्नल हेन्री आलकात २) कुमारी हेनरीना मुल्लर ३) सी.पी. गुणवर्धने
पूज्य भदंत सुमंगल, भदंत गुणानंद व जी. आर. डिसिल्वा ह्यांनी धम्म ध्वज तयार केला.
वास्तविक पाहता धम्मध्वजास पंचशील ध्वज असे संबोधल्या जाते. पण पंचशील आणि धम्मध्वजाचा काही संबंध नाही. ध्वज पाच रंगाचा नसून सहा रंगाचा आहे म्हणून त्याला षडध्वज म्हणतात. भगवान बुद्धाच्या शरीरातून ६ (सहा) रंग उत्सर्जित झाले असे म्हटल्या जाते. अठ्ठकथेच्या अनुषंगाने बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागताच्या शरीरातून सहा रंगाची प्रभा वलायकीत किरणे निघत होती. ती अनुक्रमे निळी,पिवळी,लाल,पांढरी,आणि केशरी रंग होते. त्या सहा रंगालाच अनुसरून ध्वजाचे रंग सहा ठेवण्यात आले. अशा पद्धतीने ध्वजाची निर्मिती झाली. बौद्ध धम्माची निर्मिती श्रीलंका येथे झाली. ध्वजाची हे रंग १) निळा, २) पिवळा,३) लाल ४) पांढरा ५) केशरी
धम्मध्वज हे बौद्धांचे प्रतिक आहे. त्याचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावयास हवी
तसेच आपण प्रत्येकाने आपल्या घरावर उद्या म्हणजे 8 जानेवारी *धम्मध्वज* ऊभारायला हवा. आणि हा ध्वज सतत आपले निवास,विहार,ईतर धार्मिक ठिकाणी वर्षभरही फडकवायला हवा.
उज्वला गणवीर
नागपूर
८ जानेवारी २०२२.