भारतमाता ही शुरविर नररत्नाची खाण आहे. महाराष्ट्राला महापुरुषांची उणीव कधीच भासली नाही. एकोणिसाव्या शतकातील भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते, संशोधक, विचारवंत, लेखक, प्रख्यात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले.सामाजिक , शैक्षणिक सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झिजणारे, माणसाच्या मनामध्ये समतेच्या क्रांतीची विचारधारा प्रेरित करणारे मानवमुक्तीसाठी समतेची चळवळ उभारणारे समतेचे खंदे पुरस्कर्ते सत्यशोधक ज्योतिबा फुले.
भारतातील अनिष्ट रूढी, परंपरा ब्राम्हणांच्या वर्चस्वाविरुध्द् बंड करुन शेतकरी, कष्टकरी, दीन दुबळ्या समाजासाठी चळवळ उभारुन तिचे खंमकं नेतृत्व केले. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतील स्त्री शिक्षणाचे पहिले प्रणेते होते हे विसरता कामा नये.त्यांनी आयुष्यभर स्त्रीयांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलें यांनी केला आहे.वंचित, दीन दुबळ्या समाजातील मुलांसाठी वसतिगृह स्थापन करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले भारतीय समाज सुधारक मानले जातात.
भारतीय स्त्रिशिक्षणाचे आद्य प्रवर्तक व शिल्पकार म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला जातो. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिचन धर्माच्या शिकवणुकरिता चालवलेल्या तुरळक स्वरुपातील शाळा ह्या, त्या काळात असित्वात होत्या.पण त्यांच्यासमोर बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करावी हे मात्र त्यांच्या मनात सुध्दा आले नाही.मिस् फॅरारबाईंच्या अहमदनगर येथील मिशनरी शाळेपासून ज्योतिबा फुले यांना शाळा काढण्याची प्रेरणा मिळाली.
सनातनेंचा बालेकिल्ला असलेल्या पुणे नगरीत ज्योतिबा फुले यांनी सन.१८४८ मध्ये पुणे शहरात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. उपलब्ध इतिहास असं सांगतो की, एका भारतीयाने स्वप्रयत्नाने चालवलेली पहिली मुलींची खाजगी प्राथमिक शाळा होय. स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीकारी इतिहासातील या घटनेचा खरं,तर पुणे शहराने अभिमान बाळगला पाहिजे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी केवळ स्त्रीशिक्षणाच्या प्रसार करुन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण तत्वज्ञानाचे महत्त्व विशद केले.मानवाला गुलामाप्रमाणे लाचार जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हा माणुसकीला फासलेला कालिमा आहे. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करुन.तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.तेव्हा स्त्रीविभागाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले.त्यांच्यासोबत १९ स्त्रीयांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले.
सामाजिक कार्य करत असताना त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.सत्यशोधक समाजाचे मुखपत्र ‘दीनबंधू’ साप्ताहिक चालविले जात असे. ‘गुलामगिरी ‘ हा ग्रंथ लिहिला.व तो, अमेरिकेतील चांगल्या लोकांना अर्पण केला.’ब्राम्हणाचा कसब’, शेतकऱ्याचा असूड, त्याचबरोबर संत तुकारामांच्या अभंगांचा गाढा अभ्यास होता.अभगांच्या धर्तीवर ज्योतिबानी अनेक ‘अखंड’ रचले.’अस्पृशांची कैफियत’ हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे.ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवुन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत सन.१८८८ मध्ये ‘महात्मा’ ही पदवी बहाल करुन ज्योतिबांच्या कार्याचा गौरव केला.
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक होते.एवढंच नाही.तर, भारतातील सामाजिक सुधारणेच्या क्रांतीकारक तत्वज्ञानाचे जनक होते.सामाजिक क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रत्यक्षपणे स्वतःच्या जीवनात अमलात आणण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या समकालीनांपैकी कोणालाही तेवढा प्रत्यक्षात अमलात आणता आलेला नाही.महात्मा फुले हेच खऱ्या अर्थाने भारतीय समाजक्रांतीचे जनक होत.त्यानी आपल्या जीवनात कृतीला अधी प्राध्यान्य दिल्यामुळे ते कर्ते समाजसुधारक ठरु शकले.व भारतीय समाजपरिवर्तनाला ते क्रांतिकारी दिशा देवू शकले. अशा ह्या थोर समाजसुधारक, समाजपरिवर्तन क्रांतीकारी महात्मा ज्योतिबा फुले यांस शतशः प्रणाम…!
- -प्रविण खोलंबे.
- मो.८३२९१६४९६१