लहाणपणी कुणाचे मायबाप मरू नयेत ,मायेचा किनारा लाभला नाही तर मुले रानोमाळ होतात ,अनाथ होतात ,सैरभैर होतात रमा नावाच्या एका मुलीचे आई बाबा लहानपणी मरून जातात ,लहाणसान असलेला शंकर ,आणि गौरा रमाच्या पंखाखाली आले !पण रमा ही मुलगीच सहा सात वर्षाची असताना तिने कसे संभाळावे ?कसे संभाळले असतील तीने आपले भावडं….लहाणपणापासूनच तिच्यापुढे प्रश्नांच काहूर वादळासारखे येऊन तिला कच्याट्यात घेऊ लागले होते..आधी माय गेली नंतर काही दिवसातच बाप गेला आपल्या भावडांना घेऊन रमा बापाला पाहत होती सारे लोक जमा झाले रडू लागले .रमाच्या कडे बघून म्हणू लागले…बाया बापड्या डोळ्यांला पदर लावत होती ..व म्हणत होती “आता तुच आहेस ग..बाई यांची माय अन बाप..”
ति.एवढीशी रमा सार सार समजून घेत होती..
सारे प्रश्न तिच्या पुढे उभे होते तिची अवस्था एखाद्या पतंगासारखी झाली होती ,जीवनाची निर्दयी परिक्षा आता सुरू झाली होती ,अपार दुःखे तिच्या वाटेला आले प्रश्न मोडतात पण मोडत नाही ,दुःखे हरतात पण हरत नाही ,जीवनात काय घडेल याचा नेम नसतो कल्पना ही करता येत नाही .अश्या गोष्टी कधी कधी घडून जातात सगळ्या आयुष्याचे ओघच बदलून जातात,रमा एका महासुर्याची सावली ,स्वतः जळत जळत गेली अगदी लहानपणा पासूनच पण तिने कुणाला आपल्या परिघाबाहेर ठेवले नाही .कोट्यवधी लोकांची सांस्कृतिक आई झाली रमाई माय झाली..
रमाईचा जन्म ७फेब्रुवारी १८९७रोजी दापोळजवळच्या छोट्याशा गावात वणंद येथे झाला वडीलांचे नाव भिकू धुत्रे .आईचे नाव रूक्मिणी होते.. ज्या वेळेस रमाईचा जन्म झाला त्या वेळी चांदण्याचा उजेड त्यांच्या झोपडीत दिव्याच्या दिपमाळेसारखा घरात सजला होता…त्या दिव्याची आरस पाहून दाई म्हणाली .. “जशी काही राजमाता जन्माला यावी ! अशी रोशणाई या झोपडीत सजली बैना…” कुणी म्हणे राज्याची राणी होणार, कोणी म्हणे ही राजमाता होणार.
आज ती पोरकी झाली होती,अनाथ झाली होती.. तिच्या इवल्याशा मनात प्रश्नांचा पाऊस पडता होता.. अचानक तीच्या डोक्यावर हात फिरला मायेचा , गोंविदपुरकर मामा समोर होते..काका होते यांनी रमा,गौरा शंकरला मुबंईत आणले ,भायखळ्याच्या मार्केट जवळील चाळीत राहत असत ,काका लाकडाच्या वखारीत लाकंड फोडण्याच काम करीत असे तर मामा एका सोसायटीत कामाला होत,ा रमाच्या स्वभावात अपार मार्दव होतं जणू भरलेल्या स्वच्छ निर्मल तळ्यासारख तिच मन ओघवत होत. साहा सात वर्षाची पोर मामा काकाच्या घरी राहताना मायेन राहत होती .काम करत होती ,आपल्या भावांना जपत होती.त्यांना माय होऊन घास भरवीत होती..आपल्या कुशीत घेऊन त्यांना जगवीत होती.
बघता बघता १९०८हे साल आल रमा नऊ वर्षाची झाली त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे तिच लग्न कराव ठरल होत..मामा गोविंदपुरकर आणि वलंगकर काका याच्या सहमतीने चांगला मुलगा मिळाला पाहिजे या साठी बोलणी सुरू झाली..इकडे रामजी सुभेदारांनी भीमराव यांच्या लंग्नासाठी मुली पाहणे सुरू केले होते.नवव्या वर्गात शिकत असलेले भीमराव लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास नकार देत होते तरी पण रिती रिवाजाप्रमाणे त्यांना ते लग्नाची बेडी स्विकारावी लागली रामजींनी रमाला पाहताच मुलगी पसंत केली .तिच्या डोळ्यांची चमक पाहून त्यांनी रमाची निवड केली,इतका सुंदर मुलगा आणि शिकत असलेला मुलगा बघून रमाकडील मंडळी खुपच खुष झाली होती .पुस्तकावर अपार प्रेम करत असलेला , बलदंड बाहूचा देखणा मुलगा सर्वांना मोहीत करत होता..
रमाचे लग्न झाले एका सुर्या सोबत तिचा संसार सुरू झाला. त्या सुर्याची दाहकता सोसत ती घरसंसार करत होती. बाबासाहेब हे मोठे काटकसरीचे होते. कारण घर संसाराच्या खर्चातून ही त्यांना पैश्याची बचत पुढच्या शिक्षणासाठी करायची होती..रमा बाई त्यांच्या पेक्षा ही एक पाहूल पुढे काटकसरीत होती.एक आगपेटी ची डब्बी एक महिणा ती नेत होती चुलीतला विस्तव कधीही विझू देत नसायची.. घरात जो पर्यंत रामजी बाबा होते तोपर्यंत रमाला घर संसाराची दाहकता सोसावी लागली नाही. त्याच काळात डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईला लिहायला शिकवले.वाचायला शिकवले १९१२ डिसेंबर यशंवत राव यांचा जन्म झाला ,घर कस प्राजक्ताचा फुलांनी भरून गेल..डाँ.बाबासाहेब यांना बी,ए,ची पदवी प्राप्त झाली.. रामजी बाबांना अतिशय आनंद झाला.
रमांन अनेक दुःख भोगली ,खूप मरणे पाहिली..ती मुर्तिमंत शक्तीची प्रतिमा होती …डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची आई लहानपणी निघून गेली त्यांमुळे आईच असण काय असत हे दोंघानाही माहीत होत.१९१३साली रामजी बाबा गेले .तसा संपूर्ण संकटाचा सामना सुरू झाला. डाँ ,बाबासाहेब यांचे परदेशी शिक्षण आणि इकडे दुःखात रमाची होणारी वताहत या मध्ये रमा सारखी दुःखाच्या खाईत पडत होती.तरी पण तीने कुणाची मदत घेतली नाही.१९२६पर्यंत मृत्यू झडच तिच्या संसारात लागली, तिची सासू ..जिजाबाई गेली .तेव्हा रमा भीमान तिच आजारपण काढल रमान आपल्या हातान निस्तावल होतं.
आगीतही रमांन चांदण फुलवल होत. १९२३पर्यंत भीमराव दोनदा परदेशी गेले ,पहिल्यावेळी चार वर्ष आणि दुसर् या वेळीही तेवढीच वर्ष ते परदेशात होते या दोन्ही वेळा रमाला खुप हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या याच दरम्यान रमेश ,इंदू ,गगांधर या मुलांचा मृत्यू झाला..तेव्हा रमाने बाबासाहेब यांना कळविले नाही.. कारण त्यांच्या अभ्यासावर परीणाम होता कामा नये हे रमाने जाणले होते. फक्त एकदाच १९२० मध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाण्याची तयारी करत होते तेव्हा रमाई खूप नाराज झाली होती ,कारण रमाला माहीत होत..साहेब घरी नसले की घर कस होत..दुःख संसाराचा गाडा जोडता जोडत नव्हता ..तेव्हा त्या दोघांच कडाक्याच भांडण झालं..पण नंतर रमाईला कळले ही एक विद्युत प्रवाह आहे.या प्रवाहाला आता थांबवणे शक्य नाही, साहेब अंधार नष्ट करणारच आहे.हा प्रवास आता थांबणारा नाही..
हे कळताच रमाईने डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या संसारात बांधून ठेवले नाही.
उपाशी राहून कष्ट उपसले ,मुलांचे उष्टे ,शिळे खावून जगली ,शेवटी क्षयरोगाने तिला ग्रासले अनेक औषधी उपचार केले.पण शेवटी सर्व उपाय संपले..रमाईने अनेक संकटाचा सामना केला .डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी एक एक पैसा जमा करून पूरवला वेळप्रसंगी मुलांचा मृत्यू हदयात कोरला .पण समाजातील मुले हेच आपले लेकरे म्हणून नवकोटी समाजाला पदरात घेतले..रमाईने आपल्या हातातील सोन्याबांगळ्या क्षणात मोडल्या तरी मुलांना पोटभर खावू घातले..समाजासाठी परखड भुमीका स्विकारून डाँ.बाबासाहेब परदेशात असताना सुध्दा सामाजिक लढ्यात समर्थपणे कार्य केले.. परंतू ती डगमगली नाही. कोणापुढे हात पसरला नाही…स्वाभिमानी होऊन जगली..
बाबासाहेब यांचा सन्मान करत ,अभिमानाने सार् या जगाला सांगत होती ..मी धनवान आहे माझ्या कुंकवाला आयुष्य लाभू दे..मला सोन हिरे ,मानके ,नको फक्त साहेबांना आयुष्य लाभू दे..रमाई जगातील अप्रतिम सौदंर्य शाली प्रतिभासंपन्न नवकोटीची आई होती ..माहामाता राजमाता होती समाजातील मुलांना मोठे होताना शिक्षण घेताना पाहून त्यांना रमेश,गगांधर इंदू राजरत्न हे लेकरे दिसत होते…अश्या त्यागमुर्ति रमाईचे निधन २७मे १९३५रोजी निधन झाले…डाँ.बाबासाहेब आंबेडकर व यशंवताला सोडून आपल्यातून निघून गेली..!
- सुनीता इंगळे
- मुर्तिजापूर
- 7218694305