- ओमायक्राॅन विषाणूचा
- वाढला म्हणे धोका
- शाळा सुरू होईल की नाही
- बाळ घेतो मधे झोका
- कोरोना विषाणू
- सतत बदलतो रुप
- दहशतीत मानव जगतो
- मेला सतावतो आहे खूप
- शासनाची सतर्कता
- आली नवी बंधनं
- जनतेने कसावी कंबर
- परत लावा मास्क बांधनं
- नव्यानं कामाला लागा
- लढाई झाली आहे सुरु
- ओमायक्राॅन येतोय
- आपल्या देशात तुरुतुरु
- एकमेका साहाय्य करू
- धरु परत साथ संगत
- काळजी आपण घेऊ
- बसणार नाही मृत्यूची पंगत
- धाडस आणि हिमतीने
- एकत्रित चला गीत गाऊ
- आलेल्या या संकटाला
- चला दोस्तांनो परतवून लावू
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१