मैत्रिणींनो, तुमच्यापैकी कोणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. फोन कॉल किंवा मेसेजला उत्तर देताना लक्ष विचलित झाल्याने अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत वाहन चालवत असाल तर काही ऑटो रिप्लाय अँप्स कामी येतील. त्याविषयी जाणून घेऊ..
‘गुगलच्या ‘अँड्रॉइड ऑटो अँप’मध्ये ‘ऑटो रिस्पाँड’ फिचर आहे. यात अँपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ऑटो रिप्लाय’ विभागात संदेश लिहायचा. मेसेज आल्यावर फक्त रिप्लायवर टॅप करायचं. तुम्ही ड्रायव्हिंग करत असल्याचं कळेल.
‘ऑटो रिप्लाय टेक्स्ट मेसेज’ अँप डाउनलोड केल्यानंतर ड्रायव्हिंग करताना आलेल्या कॉल किंवा एसएमएसला ऑटो रिप्लाय करता येईल. यात कॉन्टॅक्ट लिस्ट करावी. मेसेज आल्यावर ‘रिप्लाय’ ऑप्शनवर टॅप केल्यावर समोरच्याला संदेश मिळेल.
‘ऑटो एसएमएस लाईट’मुळे आलेले एसएमएस तसंच मिस कॉल्सना ऑटो रिप्लाय पाठवता येईल. गाडी चालवताना ‘ड्रायव्हिंग मोड’ ऑन करा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन मेसेज टाईप करा. यात लोकेशन शेअरची सोय आहे.