- शुक्राची चांदणी निघे तेव्हा..!
जेमतेम 1985 च्या सालातली गोष्ट असेल.माझ्याघरी बैलीची एक जोडी होती रुमाल़्या+बाबूल्या हे माझ्या बाबाची आवडीची जोडी .आधी कास्तकार बैलासाठी वैरण भरपुर जमा करुन ठेवायचे .कनिराम आडेची खारी , शेटजीची खारी व आपआपल्या शेतात , कुनी शेतात बैलासाठी मांडव टाकायचे .तेथे ऊन्हाळाभर बैल गायी,बांधायचे वासर बागडायची आमच्या भरक या शेतात कडब्याचे (गुड )सुडी लाऊन ठेवायचे .त्याच्या बाजुनी चिलाटीच्या काट्याची कुंपन करायचे ,ते हवेने पडु नये मनुन त्याला तुराट्या लावायचे, मला रोज सायंकाळी तेथुन कडबा बांधुन डोक्यावर घेऊन घरी बैलासाठी आनाव लागायचे.
संध्याकाळी अमराईच्या विहिरीवर पाणी पाजायला घेऊन जाव लागे त्या वेळेस माझे वडील शेतात सकाळीच चार वाजता (शुक्राची चांदणी निघे तेव्हा ) नांगर हानायला जा़यचे, काडोन घालुन जुंपुन ऩांगर न्यायचे ते लाकडी होते मानकोपरा येथील सुतारानी बनवलेले त्याला कुशा (लोखंडाचा दोन अडीच फुटाचा, ते लाकडी नांगर कसे दोरीची गाठ बांधुन कसे जुंपायचे ते मला आजही माहीत आहे. मग झाल तर काय ? माझ्या बाबाला मी मनालो की, मला नांगर हानायचे आहे. मला ते हानायचे जमले कारण की मला पाहून शिकण्याची कला अवगत आहे .
मग मीच शेतात सकाळीच नांगर बैलजोडी जुंपुन घेऊन जाऊ लागलो. बंधुनो एकदिवस झाल काय रात्री भुताच्या गोष्टी आमच्या बोलण्यामधे निघाल्या रामी बूवाच्या (प्रदिप चव्हाणचे वडील) वावराजवळ नाल्यामधे पिंपळच झाड आहे ना ,त्यावर रात्री भुत असतात ,असे गावातील काही माह्तारी माणस मनायची, ते डोक्यात बसल ,असेच एक दिवस मी सकाळ होतय मनुन रात्री 2=30 वा .त्या वेळेस घरात घड्याळ नव्हती, मी नांगर जुंपुन माझ्या वेरावाल्या शेताकडे ऩिघालो वरुन चंद्राचा ऊजेड, नुकतीच पोर्णीमा झाली होती. काडोनाच्या आवाजान ठुर …..ठुर.. अशा आवाजात चालत्या बैलाच्या मागे कधी पिंपळाच्या वावरात(रामप्रसाद सरीचंद चव्हाणच शेत) आलो अन समोर पिंपळाच झाड त्या चंद्राच्या अंधुक ऊजेडात दिसायला लागल अन ……मला गोष्ट आठवली ,लगेच मी बैलाचा कासरा धरुन आवरल अन बैलाच्या आडोशान पिंपळाच्या झाडाकडे पाहल तर काय … माझ्या अंगावर शहारे आले, डोळ्यात अंधारी… आल्यासारखे वाटुलागले, काय करावे सुचेना पटकण खाली बसलो, अन हातात कुशा काढुन घेतला. लोक मनतात की लोखंड हातात असल की भुत जवळ येत नाही पुन्हा मी हिमतीने बैलाला हानत पुढे गेलो व झाडाकडे बघीतल तर त्याच्याखाली काळी भोर अशी भलीमोठी सावली दिसली पण मी घाबरलो नाही. मोठ्या हिम्मतीने हातात एक साधारण गोटा घेऊन त्याकडे जोरानी भिरकावला ,खट्ट…असा आवाज आला, मला वाटल हा वाळलेला लाकुड तर नसेल ,मग आनखी हिमतीने थोड पुढ गेलो मोठ्या हिमतीने निरखुन बघीतले माझे शंका निरसन झाले, पण माझ्या आवाजाने झाडावरील मोठे पक्षी खिदळु लागले विचित्र आवाज, माणुस घाबरेल असे,, मग मी थोड शांत झालो व पुढे माझ्या शेताकडे मार्गक्रमन केल. नांगर जुंपुन हानायला सुरुवात केली दोन+ तिन आवड (ओळ्या झाल्या तरी सकाळचा ऊजेड होईना .थोडा वेळ बसलो, पुन्हा हानायला सुरुवात केली
…माझ्या वडीलास वाटले की मुलगा कधी शेतात गेला काही कळले नाही बाबा सरळ शेताकडे येऊ लागले मी माझ्या धुंदित नांगर हाकत होतो, जशी माझी नजर पिंपळाच्या शेताकडे गेली तशी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली बघतोतर काय ….तिकडुन एक काळीभोर…खुप लांब ..
एक मोठी सावली सारखी व्यक्ती माझ्याकडे येतांनी दिसली, आतातर मी एवढा घाबरलो की माझा आवाजही निघेना काय करावे काही सुचेना’ पण हिंम्मत सोडली नाही. हा पिंपळाजवळचाच असेल ..
तो आता आपल्याकडे येत आहे जशी जशी सावली जवळ येत होतो तसे -तसे अंगावर डोक्यात थरकाप येत होता मला वाटले घाबरणे बरोबर नाही हिंमतीने काम घेतले ,
चला याच्या हातात मरायचच आहे ….असे करुन हाताशी दगड जमा केले (काही वेळात) आपण यावर गोट्याचा वर्षाव करावा असे ठरले. मी टक्क लाऊन जवळ यायची वाटच बघत होतो. अन झाले काय ……तिकडुन आवाज आला ….रातेर कनाशी आवगो वावरेम..रे…… (तो माझ्या वडीलाचा आवाज ) तसे मा्झ्या हातातील गोटे कधी माझ्या हातातुन खाली पडले अन डोळ्यात ……! तेव्हापासुन मी भुताला माझ्या मनातुन मुक्त केल हे विशेष …!
- -शेषराव सवाईरामजी चव्हाण