- * छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच-निवेदिता चौधरी
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे अपमानजनक वक्तव्य संभाजी महारांच्या बद्दल विधान सभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केल्यामुळे अजित पवारांचा अमरावती ग्रामीण भाजपाच्या वतीने मंडळ स्तरावर ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.
अजित पवार यांच्या फोटोला चपला मारण्यात आल्या तर काही ठिकाणी पुतळा फुंकण्यात आला. प्रत्येक तहसील वर भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. अजित पवार व शरद पवार हिंदू हे विरोधी असून शरद पवार यांच्या साठी औरंजेब सुफी संत आहे, केवळ मुस्लिम मतांवर डोळा ठेवून अजित पवारांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे तमाम हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते याचे इतिहासात खंडीभर पुरावे आहे,पवार काका व पुतन्यांनी ते आगोदर वाचावे असे भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यावेळी म्हणाल्या, यावेळी सरचिटणीस प्रशांत शेंगोकर, जोती मालवीय, प्रवीण राऊत सुनील ढोले,विजय टेकाडे, शिरभाते, शरद मोहोड सागर माहोरे, हेर्षल चौधरी व सुनील कडू इत्यादि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–